
गोंदिया, दि.23 : भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी आणि जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा या उद्देशाने मानवी रांगोळी काढुन मतदान जनजागृती करण्यात आली.
अर्जुनी मोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी मानवी रांगोळी काढुन मतदान जनजागृती केली. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या मार्गदर्शनात स्वीपच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. युवा पिढी देशाचे भवितव्य असून त्यांना शालेय जीवनापासूनच मतदान प्रक्रियेविषयी माहिती व्हावी तसेच इतर मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी मानवी रांगोळी काढुन जनजागृती करण्यात आली.
सौंदड येथे मतदान जनजागृती उपक्रम घेण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच स्वीप सदस्य प्रशांत सरदारे यांची उपस्थिती होती.