
गोंदिया, दि.28 : 63-अर्जूनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ अंतर्गत स्वीप टीम व नवजीवन विद्यालय राका/पळसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सडक अर्जुनी तालुक्यातील नवजीवन विद्यालय राका/पळसगाव येथे 28 ऑक्टोबर 2024 रोजी मतदान जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी रांगोळी, निबंध व स्लोगन तयार करून मतदान विषयक जनजागृती केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवजीवन विद्यालय राका/पळसगाव येथील मुख्याध्यापक पद्मा चुटे होते तर प्रमुख अतिथी म्हणून स्वीप टीमचे नोडल अधिकारी स्वाती तायडे व त्यांचा स्टाफ व्ही.एम. गायधने, डी.पी. डोंगरवार, आशिष कावळे, प्रशांत सरदारे, सुरेश बोरीकर, नयन शहारे, शाळेतील एन.एस. मेश्राम, एस.एस. मेंढे, एन.डब्लू. फाये, एच.बी. डोंगरवार, एम.एस. मेश्राम, टी.ए.घरोटे, एस.जे.चांदेवार, एम.यु. दोनोडे, के.एस. मोटघरे, व्ही.एच. चाकाटे, एम.के. ब्राम्हणकर आदी शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.