बुलडाणा सात मतदारसंघात 199 जणांचे 280 नामनिर्देशन अर्ज दाखल

0
23
बुलडाणा, दि.29: भारत निवडणूक आयोगाने सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला असून नामनिर्देश अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीखा मंगळवार दि. 29 ऑक्टोंबर 2024 पर्यंत होती. अंतिम मुदतीपर्यंत सातही मतदारसंघात 199 जणांचे 280 नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहे. यामध्ये सर्वात जास्त चिखली मतदारसंघात 43 जणांचे 63 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजी घोषीत कार्यक्रमानुसार दि. 22 ते 29 ऑक्टोबर 2024 या कालावधीत नामनिर्देशन पत्र मतदारसंघनिहाय दाखल करण्यात आले. त्यानुसार प्रत्येक मतदारसंघनिहाय उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची माहिती याप्रमाणे आहे.
मतदारसंघनिहाय अर्जाची माहिती : 21-मलकापूर विधानसभा मतदारसंघात 23 व्यक्तींचे 36 अर्ज, 22-बुलढाणा विधानसभा मतदारसंघात 21 व्यक्तींचे 30 अर्ज, 23-चिखली विधानसभा मतदारसंघात 43 व्यक्तींचे 63 अर्ज, 24-सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात 37 व्यक्तींचे 49 अर्ज, 25-मेहकर विधानसभा मतदारसंघात 30 व्यक्तींचे 41 अर्ज, 26-खामगांव विधानसभा मतदारसंघात 26 व्यक्तींचे 32 अर्ज व 27-जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात 19 व्यक्तींचे 29 अर्ज असे एकूण 199 व्यक्तींचे 280 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहे. दरम्यान अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दि. 29 ऑक्टोंबर रोजी सातही विधानसभा मतदारसंघामध्ये 130 व्यक्तींचे 172 नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहे.
जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघासाठी बुधवार दि. 30 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येणार आहे. सोमवार दि. 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. बुधवार दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर शनिवार दि. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया 25 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.