गोंदिया,दि.११:-ओबीसी बहुजन समाजातील थोर संतमहापुरुषांनी समाजाच्या विकासाकरीता खूप मोठे योगदान दिले आहे.त्यातच आमच्या समाजातील संत श्री संताजी जगनाडे महाराजांनी तर संत तुकाराम महाराजांचे अभंग मुखाग्र करुन ते पुन्हा लिहून काढलेले कार्य हे दोन समाजातील घटकांना जोडणारा दुवा ठरला.त्याचप्रमाणे आपण सर्व ओबीसी समाजातील जातींची जनगणना झाल्यास आपल्या विकासाची दारे उघडतील व हक्क अधिकार मिळतील असे विचार मुख्याध्यापिका सौ.सिंधु मोटघरे यांनी व्यक्त केले.त्या श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव सर्वसमाज जागृती सम्मेलनात प्रमुख अतिथी म्हणून शास्त्री वार्ड येथे बोलत होत्या.
श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०० व्या जयंतीनिमित्त सर्व समाज जागृती सम्मेलनाचे आयोजन स्थानिक शास्त्री वार्ड येथे सर्वसमाज विचार मंचाच्यावतीने करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष ओबीसी सेवा संघाचे उपाध्यक्ष सी.पी. बिसेन होते.बिसेन यांनी यावेळी उपस्थित समुदायाला मार्गदर्शन करतांना संताचे विचार आजच्या पिढीला आत्मसात करण्याची नितांत गरज असल्याचे विचार व्यक्त केले.डॉ.संजीव रहांगडाले यांनी समाजातील कुरीतीवर भाष्य करीत त्या संपविण्याचे आवाहन केले.तसेच समाजाच्या विकासाकरीता मंंडल आयोग व भारतीय संविधानाची अमलबंजवाणी होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
प्रमुख अतिथी म्हणून यावेळी प्रेम जायस्वाल, सिंधु मोटघरे, राधेश्याम कारंजेकर, सुनील तिवारी, कमल भोंगाडे, कैलाश भेलावे, गंगाधर बावनकर, गुरमीत चावला, ज्योती कापसे, माया भेलावे, आशा भांडारकर, गिता मदनकर, राजेश्वरी रहांगडाले, रुपसागर कुंभलकर, आशिष ठकरानी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजनाकरीता सुनील भोंगाडे, रवी भांडारकर,कैलास भेलावे,संजु पटेल, सतिश धकने, प्रेम साठवने, सोनु भांजा, केशरीचंद बिसेन, राजु वैद्य, सतिश गिरी, राजु शिवनकर, प्रशांत मेश्राम तथा युवा बहुजन मंच, ओबीसी सेवा संघ,ओबीसी अधिकार मंच,ओबीसी कृती समिती, संविधान मैत्री संघाच्या सदस्यांनी सहकार्य केले.संचालन संविधान मैत्री संघ संयोजक अतुल सतदेवे यांनी केले,तर आभार राजशेखर उकरे यांनी मानले.