गोंदिया,दि.२८ः-जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानथंम यांनी आज २८ डिसेबंरला दुपारी 1.00 वाजता आमगाव तालुक्यातील आरोग्यवर्धिनी उपकेंद्र जामखरीला व आरोग्य केंद्र तिगाव येथे आकस्मिक भेट देवुन आरोग्य संस्थे मार्फत देत असलेल्या आरोग्य सेवा व सुविधाची पाहणी केली.यावेळी सोबत जिल्हा परिषद सदस्या छाबुताई ऊके,सरपंच मुकेश शिवनकर व दुष्यंत किरसान उपस्थित होते.
भेटी दरम्यान आज शनिवारी आरोग्यवर्धिनी उपकेंद्र येथे आरोग्य मेळावा संबधाने लोकांची आरोग्य तपासणी सुरु होती.राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार प्रत्येक शनिवारी आरोग्य संस्थेत थिम नुसार लोकांची आरोग्य तपासणी होत असते.आरोग्य संस्थेत समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत बिसेन यांचे मार्फत असंसर्गजन्य कार्यक्रम अंतर्गत लोकांचे रक्तदाब व मधुमेह संबधाने रक्तशर्करा पातळी तपासणी करण्यात येत होती.त्यावेळेस कार्यक्षेत्रातील आशा सेविका मंगलाबाई बोपचे,प्रभावती बघेले व रुग्ण उपस्थित होते.भेटीत त्यांनी रुग्णांशी संवाद साधुन आरोग्य संस्थेत आरोग्य सुविधा व्यवस्थित दिली जात आहे की नाही याची शहानिशी केली. गावातील रुग्ण व पदाधिकारी यांनी या वेळी आरोग्य सेवा चांगल्या प्रकारे देत असल्याबाबत पावती दिल्यामुळे मुरुगानथंम यांनी कर्मचारी यांचे कौतुक केले.
भेटीत मुकाअ एम.मुरुगानथंम यांनी आरोग्यवर्धिनी उपकेंद्रतील आतील व बाहेरील परिसराची स्वच्छता,बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी) दरम्यानच्या वेळेत मिळत असलेल्या रुग्ण सुविधा,क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे नियमित गावनिहाय भेटीचे नियोजन,राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचे रजिष्टर,औषधी साठा,प्रसुतीगृह ई.विविध बाबींचा आढावा घेवुन रुग्णसुविधा गुणवत्तापुर्वक देणे,सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करण्यात यावी, कर्मचारी यांनी कर्तव्यस्थानी ओळखपत्र व ड्रेस कोड नियमांचे काटेकोरपणे पालन करावे,आरोग्य संस्थाचे रेकॉर्ड अद्यावत करुन मुख्यालयी राहण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या.एकंदरीत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र जामखरी येथे अधिकारी व कर्मचारी यांचे मार्फत देण्यात येणार्या आरोग्य सेवा बाबत समाधान व्यक्त करुन कौतुक केले.