शेतकरी नेते डल्लेवालांच्या समर्थनात प्रकाश पोहरे यांचे २१ जानेवारीला उपोषण

0
23

वर्धा :- भारतीय किसान युनियन चे नेते जगजितसिंग डल्लेवाल यांच्या उपोषणाला साथ देण्याकरिता किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष जनलोकनायक प्रकाश पोहरे सरसावले असून त्यांनी २१ जानेवारी रोजी कान्हेरी सरप, अकोला येथील त्यांच्या शेतावर सहकाऱ्यांसह एक दिवसाच्या उपोषणाची घोषणा केली आहे.

खन्नोरी बॉर्डरवर शेतकऱ्यांच्या मागण्यांकरिता मागील ५० दिवसांपासून बेमुदत उपोषणास बसलेले वरिष्ठ शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल यांची प्रकृती गंभीर असून अघटित समाचार येऊ शकतो. त्यामुळे केंद्र सरकारने चर्चा करून त्यांचे प्राण वाचविण्याचे आवाहन करणारे पत्र किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष पोहरे यांनी पंतप्रधानांना पाठवून सकारात्मक उत्तराची अपेक्षा केली आहे. डल्लेवाल यांच्या उपोषणाच्या समर्थनात अकोला शहराजवळील त्यांचे कान्हेरी सरप येथील शेतावर २१ जानेवारी रोजी होणाऱ्या उपोषणात सर्व शेतकरी, शेतकरी नेत्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन किसान ब्रिगेड तर्फे करण्यात आले आहे. ज्यांना येणे शक्य नसेल त्यांनी आपल्या गावात उपोषणास बसावे, असेही सुचविण्यात आले आहे.

भारतीय किसान युनियनच्या समर्थनात सरसावली किसान ब्रिगेड

शेतमालाला हमी भाव आणि तो बाजारात मिळण्याचा कायदा, कर्जमाफी आदी मागण्यांकरिता भारतीय किसान युनियन (अराजनीतिक) चे नेते जगजितसिंग डल्लेवाल यांनी मागील ५० दिवसांपासून बेमुदत प्राणांतिक उपोषण सुरू केले असून आज ते अर्धवटशुद्धीत असल्याने माझ्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करावी, असे त्यांनी सुचवून ठेवले आहे. आता पुढील चर्चा करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे, पण सरकार चर्चाही करण्यास तयार नाही. शेतकऱ्यांच्या (Farmers)मागण्याकरिता जगजितसिंग डल्लेवाल यांनी जिवाची बाजू लावली आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने (High Court)त्यांच्या रक्ताचे अहवाल मागितले असून ते न्यायालयाच्या रजिस्टारकडे द्यावेत, असे सांगितले. जगजितसिंग डल्लेवाल शेतकऱ्यांच्या हिताकरिता लढत असून अघटित घडू शकते.

उपोषणात सामील होण्याचे आवाहन

शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल यांच्या उपोषण समर्थनात त्यांना साथ देण्याची गरज आहे. अशा अवस्थेत किसान ब्रिगेडचे (Kisan Brigade) राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २१ जानेवारी रोजी उपोषणाची घोषणा केली आहे. राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाचे संयोजक बसवराज पाटील वीरपूर, तसेच कार्यकारी संयोजक सुरेंद्रसिंह बिष्ट ह्यांनी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांना हे उपोषण थांबविण्याची गळ घातली आहे. जगजितसिंग डल्लेवाल यांनी त्यांचे निकटस्थ काकासिंह कोटरा यांना निरोप पाठवून माझ्या जिवाचे काहीही कमीजास्त झाले तरी शेतकऱ्यांच्या हिताचे हे आंदोलन असल्याने मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवा, असा संदेश पाठविला आहे. उपोषणादरम्यान माझे काही कमी जास्त झाले तर माझा मृतदेह खन्नोरी बॉर्डरवरील आंदोलनस्थळी ठेवला जावा, कोणीही जेवण न करता खन्नोरी बॉर्डरवर उपोषण करावे, काहीही झाले तरी शेतकऱ्यांचे आंदोलन थांबू नये.

रक्तदाब सातत्याने कमी जास्त होत असल्याने ५ रिवर्स हार्ट असोसिएशनची चमू आंदोलनस्थळी

त्याचवेळी काही शेतकरी नेत्यांनी केंद्र सरकारला (Central Govt.)इशारा दिला की काही अघटित झाले तर केंद्र सरकारला परिस्थिती सांभाळल्या जाणार नाही. २६ नोव्हेंबर २०२४ पासून जगजितसिंग डल्लेवाल यांनी त्यांना असलेल्या कॅन्सरचे औषध घेण्याचेही थांबविल्याची माहिती पहिल्यांदाच डॉ. गुरुसिमरनसिंग बुट्टर यांनी पत्रकारांना दिली. डॉ. धालिवाल आणि कुलदिप कौर यांनी त्यांच्या शरिरातले सोडियमचे प्रमाणही खूप कमी झाल्याचे सांगितले. रक्तदाब सातत्याने कमी जास्त होत असल्याने ५ रिवर्स हार्ट असोसिएशनची चमू आंदोलनस्थळी पोहोचली, त्यांनी जगजितसिंग इल्लेवाल यांची प्रकृती तपासली.