देश आणि समाज सक्षम करण्यासाठी शिक्षणाची भुमिका महत्वाची – केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव

0
14
बुलडाणा,  दि. 21 : देश आणि समाज सक्षम करण्यासाठी शिक्षणाची भुमिका महत्वाचे असून शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकांचेही कार्य महत्वपुर्ण आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले
बेंगळुरू येथील श्री श्री रविशंकर विद्या मानववीर ट्रस्टने आयोजित केलेल्या “श्री श्री एज्युकेशन अवॉर्ड्स 2025” चे केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले, त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकरजी उपस्थित होते.
मंत्री श्री. जाधव म्हणाले की पुरस्कार हे शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करते. पुरस्कार प्राप्त व्यक्तीनी समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावे, असे त्यांनी आवाहन केले. देश का प्रकृती अभियान देशात 26 नोव्हेंबर 2024 ते 25 डिसेंबर 2024 पर्यंत चांगल्यारितीने राबविल्या गेले. या अभियानात तंत्रज्ञानाचा वापर करून व्यक्तींना त्यांच्या प्रकृती संदर्भाची माहिती देण्याचं काम देशभर केल्या जात आहे. श्री श्री रविशंकर यांचा आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारने संपूर्ण देशभर लोकांमध्ये जनजागृती व सकारात्मकता आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावीत आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था जागतिक दर्जाची आहे. तणावमुक्त आणि मूल्यावर आधारित शिक्षण देत असल्याबद्दल संस्थेचे कौतुक केले. शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा आधार असल्याचे सांगून विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि नैतिक विकासावर भर दिला पाहिजे, अस मत ही त्यांनी व्यक्त केले आणि पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे अभिनंदन केले.