अर्जुनी-मोर.दि.१३ः- गावाच्या प्रशासनिक व्यवस्थेला अधिक गतिमान करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन सावरटोला येथे आज १४ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडले.कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे उपस्थित होते.यावेळी उमराव वाघधरे (मंडळ अधिकारी, नवेगावबांध),दिपाली मुद्देवार ग्राम महसूल अधिकारी सावरटोला, संदीप खोडवे ग्राम महसूल अधिकारी खिवखिडकी, नंदागवळी महसूल अधिकारी नवेगाव बांध , चौधरी मॅडम ग्राम महसूल अधिकारी देवलगाव, युवराज तरोने सरपंच सावरटोला, सुवर्णा तरोने उपसरपंच सावरटोला, संदीप तरोणे पोलीस पाटील उमरी, कुरुंदाताई वैद्य सरपंच बोरटोला वामन राऊत संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोर, शंकर तरोणे पोलीस पाटील सावरटोला, संगीता भांडारकर पोलीस पाटील बोरटोला, उर्मिलाताई शिवणकर ग्रामपंचायत सदस्य सावरटोला, योगेश लाडे सेवा सहकारी संस्था अध्यक्ष बोरटोला , भागवत मुनेश्वर, भागवत येरणे इतर मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यालयाच्या स्थापनेमुळे स्थानिक रहिवाशांना महसूल संबंधित कामे सोपी आणि जलदगतीने होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली