पशुपालन व दुग्ध व्यवसायाचा विकास करण्यासाठी शासन कटीबध्द:- आमदार राजकुमार बडोले

0
571

निमगाव येथे जनावरे,पशुपक्षी प्रदर्शनी व शेतकरी मेळावा
अर्जुनी-मोर. पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्वपूर्ण घटक आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन दुग्ध उत्पादन वाढविणे शेतक-यांसाठी आर्थीकदृष्ट्या अत्यंत गरजेचे आहे.शेतक-यांनी धान व ईतर पिकांसोबतच भरपुर दुध उत्पादन देणारे संकरीत जनावरे पालन करुन पशु आरोग्य व्यवस्थापन करुन शासनाचे विविध योजनांचा लाभ घेवुन धवल क्रांतीच्या दिशेने वाटचाल करावी.अशा प्रदर्शनांच्या माध्यमातुन शेतकरी व पशुपालकांना नवे ज्ञान व दिशा मिळते.जे त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवु शकते.त्यासाठी पशुपालन व दुग्ध व्यवसायाचा विकास करण्यासाठी शासन कटीबध्द असल्याचे प्रतिपादन आमदार व माजी मंत्री ईंजी.राजकुमार बडोले यांनी केले आहे.
जि.प. गोंदिया व पं.स.अर्जुनी-मोर. यांचे संयुक्त विद्यमाने निमगाव येथे आयोजित तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन व मार्गदर्शन मेळाव्यात ता.16 मार्च रोजी उदघाटक म्हणुन आमदार राजकुमार बडोले बोलत होते.
मेळाव्याचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर होते,यावेळी जिल्हा परिषद सभापती डॉ. लक्ष्मण भगत, दिपाताई चंद्रिकापुरे सभापती जि.प. गोंदिया, पौर्णिमाताई ढेंगे सभापती जि.प. गोंदिया, यशवंत गणविर माजी उपाध्यक्ष तथा सदस्य, जि.प. गोंदिया, आम्रपालीताई डोंगरवार सभापती पं.स. अर्जुनी/मोर, संदीप कापगते उपसभापती पं.स. अर्जुनी/मोर, कविताताई कापगते सदस्या, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती जि.प. गोंदिया, श्रीकांत घाटबांधे सदस्य, जि.प. गोंदिया, तानाजी लोखंडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. गोंदिया, डॉ. जे.के. तीटमे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त जि.प. गोंदिया, डॉ. के.पी. पटले जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि.प. गोंदिया, होमराज पुस्तोडे पं.स. सदस्य, सविताताई कोडापे, नुतनलाल सोनवाने, नाजुक कुंभरे, पुष्पलताताई दृगकर, कुंदाताई लोगडे, शालिनीताई डोंगरवार, सौ. भागेश्वरीताई सय्याम, शैलजाताई सोनवाणे माजी सभापती, अमरचंद ठवरे, वंदेश्वरीताई राऊत सरपंच ग्रा.पं. निमगाव, संदीप पुस्तोडे उपसरपंच निमगाव, विलाश फुंडे सरपंच पिंपळगाव, सचिन डोंगरे सरपंच चान्ना, सुखदेव मेंढे उपसरपंच सिलेझरी, छगन पातोडे उपसरपंच अरततोंडी, काशिनाथ कापसे उपसरपंच बोरटोला/इंजोरी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पशुपक्षी प्रदर्शनीमधे आलेल्या पशुपक्ष्यांची तज्ज्ञांकडून पहाणी त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.तर तालुक्यातील उत्कुष्ठ शेतकरी यांनाही सन्मानित करण्यात आले.यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.या प्रदर्शनीमधे बचत गटाचे माध्यामातुन शेतीवर व पशुसंबधी आधारीत विविध स्टाल सुध्दा लावण्यात आले.पशुपालनातुन शेतकरी यांना योग्य मार्गदर्शन मिळावे पशुपालनातुन शेतकरी समृध्द व्हावा या उद्देशानेच मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची भुमिका उपसभापती संदिप कापगते यांनी प्रास्ताविकातुन मांडली.संचालन महेश राठोड यांनी तर उपस्थितांचे आभार डि.के.लांजेवार यांनी मानले.