सारस पक्षाचे ११केव्ही विद्युत तारेच्या शॉकमुळे मृत्यू..!

0
143

गोंदिया :– तालुक्यातील माकडी येथील शेत शिवारात विद्युत तारेच्या शॉकमुळे टॅगिंग/रिंगिग झालेल्या निमवयस्क सारस पक्ष्याचा ११ केव्ही विद्युत तारेला स्पर्श झाल्याने मृत्यू झाल्याची घटना आज 26 मार्च रोजी सकाळी नऊ वाजे दरम्यान उघडकीस आली.घटनेची माहिती मिळताच सारस संवर्धनाकरीता लढा देणारे सेवा संस्थेचे सावन बहेकार व वनविभागाचे अधिकारी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृत सारस पक्षाला पशुसंवर्धन विभाग कार्यालय गोंदिया येथे हलविण्यात आले असून शवविच्छेदन करण्यात आले.