दिलेल्या वेळेत प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे आमदार सुधाकर अडबाले यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
गडचिरोली : आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील जि. प. / खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्यांबाबत समस्या निवारण सभा २९ एप्रिल २०२५ रोजी व्ही. सी. हॉल, जिल्हा परिषद गडचिरोली येथे पार पडली. या समस्या निवारण सभेत १ मुख्याध्यापक, २ सहा. शिक्षक व १ निवड श्रेणी प्रस्तावास “ऑन द स्पॉट” मान्यतेचे पत्र देण्यात आले.
‘समस्या तुमच्या पुढाकार आमचा’ या ‘वि.मा.शि. संघा’च्या उपक्रमांतर्गत सभेत सुरुवातीला माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागातील सामूहिक व वैयक्तिक विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने सौ. विजया राजेंद्र मने (श्रीमती सिंधुताई पोरेड्डीवार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, गोगाव) यांना मुख्याध्यापकपदी, श्री. पि. बी. मंदुरकर, श्री. मधुकोत महादेव रामटेके (वसंत विद्यालय, गडचिरोली) यांना सहा. शिक्षक पदोन्नती, श्री. ध्न्यानेश्वर देविदास शिवणकर (सहा. शिक्षक, भगवंतराव हायस्कूल, लखमापूर बोरी) यांना निवड श्रेणी प्रस्तावास ऑन द स्पॉट मान्यतेचे पत्र देण्यात आले. यामुळे शिक्षक – कर्मचाऱ्यांनी आमदार सुधाकर अडबाले यांचे आभार मानले.
सोबतच वरिष्ठ / निवड श्रेणी, दुय्यम सेवापुस्तक, आश्र्वासित प्रगती योजना व इतर प्रलंबित प्रकरणे दिलेल्या वेळेत निकाली काढण्याच्या सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षणाधिकारी (माध्य.) यांना दिल्या.
यानंतर प्राथमिक विभागातील सामूहिक व वैयक्तिक विषयांवर चर्चा करण्यात आली. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सामूहिक व वैयक्तिक प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढण्याचे निर्देश आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षणाधिकारी (प्राथ./ माध्य.) यांना दिले. सदर सभा साडेसहा तास चालली.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर शेलार, शिक्षणाधिकारी (माध्य.) वासुदेव भुसे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) श्री. पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विलास कावळे, वीरेंद्र चौधरी, उपशिक्षणाधिकारी श्री. नाकाडे, श्री. बारेकर, सर्व गटशिक्षणाधिकारी, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नैताम, जिल्हा कार्यवाह अजय लोंढे, कार्याध्यक्ष नरेंद्र भोयर, प्राचार्य समशेर खा पठाण, जयंतराव येलमुले, किशोर पाचभाई, अजय वर्धेलवार, मनोज निंबार्ते, संजय घोटेकर, प्रा. संदीप अर्जुनकर, ओमप्रकाश संग्रामे, विवेक हुलके, श्री. नागापूरे, विठ्ठल निकुले, चव्हाण सर, शरद गायकवाड,
विजय कुत्तरमारे, माणिक पिल्लारे, संजय कुनघाडकर, संजय चांदेकर, संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व जिल्ह्यातील समस्याग्रस्त शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.