33.7 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home विदर्भ मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय मदत कक्षाचे जिल्हाधिकारी प्रजीत नायर...

मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय मदत कक्षाचे जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांच्या हस्ते उद्घाटन

0
93

blank

 गोंदिया, दि.2 एप्रिल – मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालयांमार्फत नागरिकांना द्यावयाच्या मदतीसाठी कार्य करणाऱ्या जिल्हास्तरीय मदत कक्षाचे जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांच्या हस्ते उद्घाटन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

 जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हा कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बहिरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांच्यासह आरोग्य विभागाचे व जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात, जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाद्वारे रुग्णांना वैद्यकीय उपचाराकरीता अर्थसहाय्य सहज उपलब्ध व्हावे, नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या प्रकरणाची माहिती आपल्याच जिल्ह्यात व्हावी तसेच नागरिकांच्या पैशाचा व वेळेचा अपव्यव टाळण्यासाठी हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.