विदर्भवाद्यांनी महाराष्ट्र दिनी पाळला काळा दिवस; इंदिरा गांधी चौकात केले धरणे आंदोलन

0
11

गडचिरोली :-  स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करावी तसेच अन्य मागण्याकडे शासन कानाडोळा करीत असल्याच्या निषधार्थ विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने काल १ मे रोजी महाराष्ट्रदिनी काळा दिवस पाळण्यात आला. या अंतर्गत इंदिरा गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारने  विदर्भाचे स्वतंत्र राज्य तात्काळ निर्माण करावे,शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती करण्यात यावी, अन्नधान्यावरील जीएसटी (GST)  रद्द करण्यात यावी रेल्वे ,विमानतळ, औद्योगिक वसाहती करिता शेतकर्‍यांची जमीन अधिग्रहित करताना शेतकर्‍यांशी वाटाघाटी करून बाजारभावा नुसार एकरी १२५ ते १५० लाख रुपये  प्रति एकर या दराने जमीन अधिग्रहित करण्यात यावी तसेच भूमिहीन होणार्‍या शेतकर्‍याच्या कुटुंबात शासकीय नोकरी देण्यात यावी,  गडचिरोली जिल्ह्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यात यावेत , सुरजागड कोनसरी या कारखान्यामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना प्रशिक्षित करून नोकरी देण्यात यावी, शेतातील पिकांचे नुकसान करणार्‍या रानटी हत्तींचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा, ग्रामीण भागातील विजेचे लोड शेडिंग बंद करण्यात येऊन शेतकर्‍यांना २४ तास वीज पुरविण्यात यावी. या मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

या धरणे आंदोलनात जिल्हा समन्वयक अरुण पाटील मुनघाटे,  जिल्हा उपाध्यक्ष रमेश उप्पलवार, शालिक नाकाडे, घीसु  पाटील खुणे, नसीर जुम्मन शेख, रामचंद्र  कोडाप, ठाकूराम कोसरे, श्यामराव वाघाडे, मदनसिंग ब्रम्हनायक, शोभराज सोनजाल, दुधाराम सहारा, जगदीश म्हस्के, महिला आघाडीच्या अर्शी मतीन शेख,हेमंत मरकाम, गुरुदेव भोपये उपस्थित होते.या आंदोलनाला आम आदमी पार्टीचे जिल्हा समन्वयक नसिर हाशमी, जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण सावसाकडे, मनिष मोडक, रोशन डोंगरे यांनी भेट देऊन स्वतंत्र विदर्भ राज्याच्य मागणीला जाहीर पाठींबा दिला.