गोंदिया,दि.०२ मे : जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय विभागात सन २०१४-२५ या आर्थिक वर्षात काम करतांना दिलेले काम तसेच आपल्या कामाशी प्रामाणिकपण निष्ठा ठेवत कर्त्यव्य पार पाडतांना उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या कर्मचारी वर्गाचा सत्कार १ मे महाराष्ट्र दिन व गोंदिया जिल्हा वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या प्रांगणात करण्यात आला.झेंडावंदन कार्यक्रमानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या हस्ते गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या गोरेगाव पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी संजय बनकर तसेच जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सहाय्यक निखिल बागडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मुरंगनाथम,जि.प.उपाध्यक्ष सुरेश हर्षे,पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक,सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कुतीरकर,कार्यकारी अभियंता सत्यजित राऊत यांच्यासह याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी व जिल्हा परिषदेतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.