गोंदिया,दि.०६:येथील एमआयडीसी मुंडीपार येथील राईस मिल व्यापारी वर्गाच्यावतीने आज,महावितरणचे मुख्य अभियंता सुहास रंगारी यांच्या सोबत संवाद साधत आपल्या समस्या मुख्य अभियंता पुढे मांडल्या.त्यांत मुंडीपार येथील HT,LT Connection चा व्यापारी वर्गाना होत असलेल्या विजेच्या समस्या मांडल्या व तात्काळ निवारण करण्याची मागणी केली.
शुभलक्ष्मी राइस मिल चे मालक व राइस मिल असोसिएशनचे चे अध्यक्ष, हुकुमचंद अग्रवाल व व्यापारी मंडळाचे प्रतिनिधी, यांनी मुख्य अभियंता यांच्याशी बोलताना या वेळी आपल्या विविध समस्या जसे औद्योगिक फिडर वर येणार्या समस्या विस्तार पूर्वक मांडल्या.
त्यानुसार, मुंडीपार येथे फिडर ट्रीप होत असल्यामुळे बर्याच वेळी वीज पुरवठा खंडित होतो. परिणामी, त्याचा फटका स्थानीय उद्योग, विशेष करून राईस मिल, व्यापारी यांना होतो.बर्याच वेळी, ट्रीपींगची समस्या होते, व अर्धा तास ते पाउण तास या वेळे दरम्यान वीज पुरवठा खंडित होऊन, त्याचा फटका, व परीणाम, उद्योजक, व राईस मिल व्यापारी वर्गाला होतो. तसेच लघु व्यापारी वर्गाला सुद्धा याचा फटका होत असतो.
यावर मुख्य अभियंता, श्री. रंगारी यांनी वारनवार ट्रिपिंग च्या समस्येवर तोडगा काहडत, 33 KV फिडर चे लोड कमी करण्याचे आश्वासन दिले. तसेच, या एम आय डी सी फिडर चे तान दुसरी कडे वळवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.या वेळी, गोंदिया डिविजन चे कार्यकारी अभियंता आनंद जैन व उपकार्यकारी अभियंता,गजानन देव्हारे व एस.के चव्हाण, सहाय्यक अभियंता अन्य अभियंते, व व्यापारी वर्गाचे प्रतिनिधी उपस्थित होते.