किशोर पर्वते यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह मिळाल्याबद्दल कोहळी विकास मंडळाकडून सत्कार

0
116

गोंदिया,दि.०८–येथील पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांना त्यांच्या उत्कट कार्याबद्दल 2024 चे महासंचालक सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येवून गोंदिया चे पालकमंत्री तथा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयात महाराष्ट्र दिनी त्यांना सदर कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले
कोहळी समाज विकास मंडळात सुद्धा त्यांचे उल्लेखनीय कार्य असल्यामुळे
त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल व सन्मान चिन्ह मिळाल्याबद्दल कोहळी समाज विकास मंडळ गोंदिया कडून त्यांचा शाल श्रीफळ व मोमेटो देऊन सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी विकास मंडळाचे केंद्रीय उपाध्यक्ष अमोल पाटील मुंगमोडे ,गोंदिया कोहली समाज विकास मंडळाचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार, दिलीप लोधी , डॉ. महेंद्र संग्रामे , पोलीस उपनिरीक्षक अनिल डोंगरवार उपस्थित होते.