देवरीत टिल्लू पंप लावून पाणीचोरी करणा-या विरूध्द धरपकड अभियान

0
333

■ देवरी नगरपंचायत द्वारे शहरात धरपकड मोहीमेला सुरवात.

देवरी,दि.०९:स्थानिक नगरपंचायत प्रशासनाद्वारे नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. परंतु, काही महाभाग पाणी पुरवठा करणाऱ्या नळाला टूल्लू पंप बसवून अधिकचा पाणी घेतात. यामुळे पाणी वितरण व्यवस्था प्रभावीत होत असून इतर नागरिकांना पाणी पुरवठा कमी प्रमाणात होत असतो. परिणामी, अवैधरीत्या नळाला टुल्लू पंप लावणाऱ्या विरुद्ध नगरपंचायत प्रशासनाने कंबर कसली असून त्याविरूद्ध धरपकड कार्यवाही सुरू केली आहे.

  देवरी नगरपंचायत द्वारे विविध वार्डात पाणीपुरवठा विभागाच्या वतीने प्रत्येक घरात नळाद्वारे पाणिपुरवठा करण्यात येतो. परंतू ,काही लोक या नळा वर टिल्लूपंप लावून अवैद्यरित्या पाणि पुरवठा करतात त्यामुळे इतर लोकांना पाणी कमी प्रमाणात मिळतो. याला आळा घालण्याकरीता नगरपंचायत पाणि पुरवठा विभागाच्या पथकाद्वारे टिल्लूपंप धरपकड मोहिम मागील २२ एप्रिल पासून सुरू केली आहे.
या अभियानाद्वारे देवरी येथील वार्ड क्रं.८,९,१४ मधील एकूण चार लोकांच्या घरून टिल्लूपंप जप्त करून या प्रत्येक लोकांविरूध्द पाच हजार रूपयाच्या दंडाची कारवाई केली.
पाणीपुरवठा विभागाच्या या पथकात पाणीपुरवठा अभियंता सुनील नागपूरे, लिपीक देवचंद बहेकार,वाँल ऑपरेटर रफीक शेख, कृष्णा डोये,रमेश कुंभरे, संजय कानेकर आदींचा समावेश असून ही टिल्लूपंप धरपकड कारवाई सतत सुरू आहे.
या कारवाई मुळे देवरी ंशहरात अवैद्यरित्या टिल्लूपंप बसविणाऱ्या लोकांचे टांगलेच धाबे दणाणले आहे.