आमगाव,दि.१२ः आमगाव वनपरिक्षेत्रातील कट्टीपार बिट अंतर्गत रामजीटोला मुंडीपार मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत काळविटाचा मृत्यू झाल्याची घटना आज १२ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.अपघातात काळविट मृत पावल्याची माहिती स्थानिकानी आमगाव येथील क्षेत्र सहाय्यक कु.आर.एस.गव्हाणे यांना दिली.त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत मृत काळविटाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणी केल्यानंतर वनपरिक्षेत्राच्या परिसरातच जाळण्यात आले.