इंदिराटोली येथे पाणीटंचाईमुळे बोरवेलचे भूमीपूजन

0
44

तिरोडा,दि.१३ः तालुक्यातील सरांडी येथील इंदिराटोली मध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे जिल्हा परिषद गोंदियाच्या समाजकल्याण सभापती सौ रजनीताई कुंभरे यांच्या हस्ते बोरवेलचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी पाहूणे म्हणून पंचायत समिती सदस्य कुंताताई पटले,सरांडीच्या सरपंच सौ. मिताताई दमाहे, उपसरपंच राजु दमाहे, माजी सरपंच किशोर दमाहे ,दिनेश लिल्हारे ग्रा. प. सदस्य, प्रदिप कटरे, माजी ग्राम पंचायत सदस्य, भुमेस्वर बांगरे , नामदेव नंदरधने , सनोज शेंद्रे, सुनील देशमुख,आणि सर्व गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत भूमिपूजन संपन्न झाले.