बालकांच्या भविष्यांची शिदोरी बालसंस्कारातून घडवावी-गणेश बोदडे

0
8

अर्जुनी-मोर.-लहान मुले मातीच्या गोळा, त्याला घडवण्यासाठी, योग्य आकार देण्यासाठी पालकांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सामान्य माणसाला अर्पण केलेली ग्रामगीतेतील विचार आचारातून घडवावे . सुसंस्कार शिबिरातून बौद्धिक ,शारीरिक ,मानसिक, कलागुणांचे संस्कार रुजविण्याचे कार्य राष्ट्रधर्म प्रचार समिती प्रमुख आचार्य हरिभाऊ वेरूळ गुरुजी यांचे मार्गदर्शनात करीत असल्याचे प्रतिपादन शिबीर प्रमुख गणेश बोदडे गुरुजी यांनी केले
राष्ट्रधर्म प्रचार समिती राष्ट्रधर्म प्रचार समिती तथा श्री गुरुदेव सेवा मंडळ बोरी सावरी द्वारे श्री गुरुदेव सर्वांगीण बाल सुसंस्कार निवासी शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरी सावरी येथे 3 ते 10 मे ला घेण्यात आले होते .रोज सकाळी सामुदायिक ध्यान ,योगासन, लाठीकाठी ,भजन , गायन,बौद्धिक ,संगीत वर्ग सामुदायिक प्रार्थना, राष्ट्रसेवा, राष्ट्रप्रेम, राष्ट्रवंदना इतर कार्यक्रमाचे आयोजन करून सर्वांगीण बाल विकासाचे धडे यामधून देण्यात आले. यामध्ये परिसरातील पुढारी , समाजकारणी , प्रतिष्ठितानी शिबिराला वारंवार भेटी देऊन प्रशिक्षक विद्यार्थी आयोजकाचे अभिनंदन केले .
शिबिराच्या समारोपिय कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत झोळे हे होते तर प्रमुख पाहुणे डॉक्टर राजेश संग्रामे ,डॉक्टर राजेश चांडक डॉक्टर पिंकू मंडल, सुनील तरोने, यशवंत परशुरामकर, लोकपाल गाहाणे ,एकनाथ बोरकर, किशोर तरोने ,सर्वेश्वर भुतडा ,प्रशांत फुंडे ,उद्धव मेहेंदळे, होमदास ब्राह्मणकर , किशोर ब्राह्मणकर, डॉक्टर महेश नाकाडे, डॉक्टर दीपक रहिले, डॉक्टर उल्हास गाडेगोणे व ईतर होते.शिबिर प्रमुख अक्षय देशमुख दुर्योधन मैंद,गणेश बोदडे पूजा बोदडे,नितीन सुरकर ,सौरभ कोल्हे ,मंदार परशुरामकर यांचे प्रमुख अतिथी द्वारे सत्कार करण्यात आले .कार्यक्रमाचे संचालन भूवेंद्र चव्हाण आभार सोमेश्वर सोंदरकर यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता दुर्योधन मैंद ,हिरालाल घोरमोडे,सोमेश्वर सोंदकर ,पांडुरंग ठाकरे , शंकर ठाकरे, मुरलीधर ठाकरे , पंढरी भोंडे, पियुष दोनाडकर ,वरून दोनाडकर, क्षितिज सोंदरकर,आयुष चव्हाण, किशोर डोणारकर, विशू ठाकरे व इतरांनी परिश्रम घेतले.