
गोंदिया- गोंदिया ते चांदा फोर्ट -बल्लारशाह जाणाऱ्या रेल्वे मार्गावर भीमनगर येथे असलेल्या रेल्वे चौकी बहुतेक वेळा बंद असल्यामुळे या भागातील सुमारे ५० हजार लोक त्रस्त आहेत “.म्हणूनच परिसरातील नागरिकांनी ही समस्या सोडवण्यासाठी स्थानिक आमदार विनोद अग्रवाल यांना निवेदन सादर केले. अमित भालेराव, जयंत कुंभलवार, शैलेश टेंभेकर, रविकांत कोटांगळे रवी भालाधरे, प्रवीण बोरकर इत्यादींनी सादर केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, गोंदिया जक्सन ते चांदाफोर्ट, बल्लारशाह या रेल्वे मार्गावर भीमनगर येथे महत्वाच्या मुख्य मार्गावर रेल्वे फाटक आहे व यावरूनच डॉ. आंबेडकर वॉर्ड, सिग्नल टोली, कुंभारे नगर, सावित्रीबाई फुले नगर, श्रीनगर, चंद्रशेखर वॉर्ड, भीमनगर, मुरी येथील लोकांसाठी या रेल्वे फाटकावरूनच रुग्णालय, शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ आणि इतर भागात जाण्यासाठी या परिसरातील लोकांचा मुख्य मार्ग आहे, जे बहुतेक वेळा बंदच राहतो व लोकांना फाटक उघडण्याची तासन्तास वाट पहावी लागते. यामुळे लोकांना त्यांच्या दैनंदिन कामात अडचणी येत आहेत. सदर निवेदनात लोकांनी असे सुचवले की, जर भीमनगर गेटजवळील सिग्नल केबिनजवळ हलवला तर लाल सिग्नल असूनही, चांदा फोर्ट वरून येणाऱ्या गाड्या फाटक ओलांडून पुढे जाऊ शकतील. किंवा, मुरी रेल्वे क्रॉसिंग फाटकाच्या शेजारी सिग्नल पिलर बसवणे सोयीचे होईल आणि फाटक उघडे राहू शकेल. आमदार अग्रवाल यांनी ही समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या पातळीवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.