घरकुल लाभार्थ्यांसाठी नवीन वाळू धोरणाची तातडीने अमलबजावणी करा-आ. विजय रहांगडाले

0
6

तिरोडा:- माहे एप्रिल महिन्यात शासनाने नवीन वाळू धोरण लागू केलेले आहेत त्याअनुषंगाने ३० एप्रिल २०२५ ला नवीन वाळू निर्गती धोरण महाराष्ट्रात लागू केले असून नवीन धोरणानुसार पर्यावरण अनुमतीप्राप्त वाळू गटापैकी जे वाळू गत लिलावामध्ये गेलेले नाहीत अशा वाळू गटामधून शासनाच्या विविध घरकुल योजनांच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना कुठलेही शुक्ल न आकारता ५ ब्रासपर्यंत मोफत वाळू उपलब्ध करण्याबाबत सूचित केले आहे यामध्ये वाळू गटासोबत अवैध उत्खनन व जप्त केलेली वाळूचादेखील समावेश आहे सदर ग्रामीण भागातील घरकुल पात्र लाभार्थ्याची यादी गटविकास अधिकारी व शहरी विभागातील पात्र लाभार्थ्यांची यादी मुख्याधिकारी यांनी तहसीलदार यांचेकडे सादर केल्यानंतर तहसीलदार यांनी जवळचा वाळू गट नमूद करून आनलाईन पासेस उपलब्ध करून द्याव्यात याकरिता पात्र लाभार्थ्यांनी तहसीलदार यांच्याकडे अर्ज करण्याची आवश्यकता नाही यामध्ये आनलाईन प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्यास आफलाईन पासेस उपलब्ध करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत यामध्ये शासनाच्या घरकुल लाभार्थ्याव्यतिरिक्त इतर नागरिकांना ५ ब्रास मर्यादेत ६६० रुपये तसेच इतर शासकीय बांधकामाकरिता अंदाजपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेल्या दराप्रमाणे वसूल करून रेती उपलब्ध करण्याबाबत सूचना दिल्या आहेत याची तातडीने अमलबजावनी होवून घरकुल लाभार्थ्याचे थांबलेले कामे तसेच इतर कामे लवकरात लवकर सुरु व्हावीत याकरिता तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी उपविभागीय कार्यालय तिरोडा येथे बैठक बोलावून सूचना दिल्या या बैठकीमध्ये प्रामुख्याने प्र.उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, गोरेगाव तहसीलदार प्रज्ञा भोकरे, प्र.तिरोडा तहसीलदार ए.पी.मोहनकर, गटविकास अधिकारी जी.टी.सिंगनजुडे, न.प.मुख्याधिकारी अमोल म्हाळकर उपस्थित होते.