
■ नगरोत्थान महाभियाना अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन
—————————-
देवरी,ता.१९: येथील नगर पंचायत क्षेत्रातील नागरिकांच्या जीवनावश्यक गरजांच्या पूर्ततेसोबतच त्यांच्या सुख सुविधांमध्ये मोलाची भर घालून जीवनमानाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न विविध विकास योजना राबवून नगर पंचायत सातत्याने कार्य करीत आली आहे. या अंतर्गतच नगरोत्थान महाभियानातर्गत ६५ कोटी रूपये किमतीच्या नवीन पाणिपुवठा प्रकल्पाचे भूमिपुजन जि.प.शाळेच्या मागील पाणी टाकीच्या पटांगणावर उत्साहात पार पडले.
शहराच्या नवीन पाणिपुवठा प्रकल्पाचे भूमिपुजन व पायाभरणी सोहळ्याचे उद्घाटन विधान परिषदेचे आमदार डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते आणि या क्षेत्राचे आमदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
या प्रसंगी देवरीचे नगराध्यक्ष तथा भाजपाचे तालुकाध्यक्ष संजू उईके,विरेन्द्र अंजनकर,देवरी पं.स.चे सभापती अनिल बिसेन, उपसभापती शालीकराम गुरनुले,कल्पनाताई वालोदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रमोद संगीडवार, न.पं.च्या उपाध्यक्ष प्रज्ञाताई संगीडवार,न.पं.च्या बांधकाम व पाणी पुरवठा सभापती आफताब शेख(अन्नूभाई),अर्थ नियोजन, विकास आणि क्रिडा सभापती संजय दरवडे,महिला व बालकल्याण सभापती सिताबाई रंगारी,नगरसेवक रितेश अग्रवाल, सरबजितसिंग भाटिया,मोहन डोंगरे, नितिनकुमार मेश्राम,पंकज शहारे,महेश जैन,बबलु कुरैशी,नगरसेवीका कौशल्याबाई कुंभरे,सुनिताबाई शाहु, तनुजाताई भेलावे,पिंकीताई कटकवार,कमलबाई मेश्राम,नुतनताई सयाम,हिनाताई टेंभरे यांच्यासह शहरातील प्रतिष्ठीत नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्तावीक देवरी न.पं.च्या मुख्याधिकारी कु. करिश्मा वैद्य यांनी तर संचालन प्रवीण दहिकर यांनी केले. आणि उपस्थितांचे आभार न.पं. चे कर्मचारी विजय पटले यांनी मानले.या कार्मक्रमाच्या आयोजना करीता न.पं.चे सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी सहकार्य केले.