चाळिशीनंतर नंतर प्रत्येकाने आपल्या आरोग्याचे सगळ्या चाचण्या करणे गरजेचे- डॉ.सुरभी गिर्हेपुंजे

0
166

एक दिवस पोलीसांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पालांदुर/जमी.चा नाविण्यपुर्ण उपक्रम
देवरी,दि.26 मे- कायदा सुव्यवस्थेचे रक्षण करताना, गुन्ह्यांचा तपास,आंदोलने,मोर्चे,व्हीआयपीचे दौरे, नक्षलविरोधी गस्त यामुळे पोलिसांना जास्त वेळ कर्तव्य बजवावे लागते.या कारणाने त्यांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेता येत नाही.या सर्व गोष्टींच्या विचार करून साप्ताहिक आरोग्य मेळाव्यातुन देवरी तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षल प्रभावित पोलीस स्टेशन चिचगड अंतर्गत मगरडोह तेथील “एक दिवस पोलीसांसाठी” या नाविण्यपुर्ण उपक्रमातुन सशस्त्र दूरक्षेत्र पोलीस ठाणे मगरडोह येथील पोलिसांची व कार्यक्षेत्रातील नागरिकांची आरोग्य तपासणी दि.24 मे रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पालांदुर/जमी. मार्फत करण्यात आली.
लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांकडे मनुष्यबळ कमी असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण येतो.अनेकदा पंधरा ते सोळा तास काम करावे लागते.जागरण,अवेळी जेवण यामुळे अनेक व्याधी जडू शकतात.पोलिसांनी निरोगी राहावे या उद्देशाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरभी गिर्हेपुंजे यांनी याप्रसंगी म्हटले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,जमादार,हवलदार असे विविध पदांचे अधिकारी, कर्मचारी व कार्यक्षेत्रातील नागरिक रक्तदाब,मधुमेह,सिकलसेल,विविध प्रयोगशाळा तपासणी रक्त तपासणी व समुपदेशन सोबत स्थलांतरीत लोकांचे हिवताप रक्त नमुने, आरडीके किट ने रक्त सुद्धा तपासणी करण्यात आले. चाळिशीनंतर नंतर प्रत्येकाने आपल्या आरोग्याचे सगळ्या चाचण्या करणे गरजेचे असल्याचे यावेळी पालांदुर/जमी.चे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरभी गिर्हेपुंजे यांनी याप्रसंगी म्हटले.
शिबीरा दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरभी गिर्हेपुंजे,आरोग्य सहायिका शोभा पडोळे,आरोग्य सेविका साधना डोरले, फार्मासिस्ट मोनिका बहेकार,आरोग्य सेवक सदाशिव अण्णाकडे तसेच आशा सेविका यांनी आरोग्य सेवा दिली.उपस्थितांना वैद्यकिय अधिकारी डॉ.सुरभी गिर्हेपुंजे यांनी सिकलसेल व असंसर्गजन्य आजार जसे रक्तदाब, मधुमेह व कर्करोग विषयी मार्गदर्शन व समुपदेशन केले.सशस्त्र दूरक्षेत्र पोलीस ठाणे मगरडोहच्या वतीने पोलीस उपनिरिक्षक प्रशांत नारखेडे, खेदराज राऊत व त्यांचे पोलीस हवालदार यांनी आरोग्य तपासणी शिबीर यशस्वीसाठी सहकार्य केले.