शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग !महाबिजची खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्यशाळा उत्साहात

0
16
वाशिम,दि.२८ मे – पोखरा टप्पा क्र. २ अंतर्गत समाविष्ट उकळीपेण/सुखळी (ता. वाशिम) येथे दि. २१ मे २०२५ रोजी महाबिजच्या वतीने खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेला शेतकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
या कार्यशाळेस महाव्यवस्थापक (उत्पादन) विवेक ठाकरे, विभागीय व्यवस्थापक (अकोला) गजानन देशमुख, तालुका कृषी अधिकारी (वाशिम) अतुल साहेब, कृषी संशोधन केंद्र (A.R.S.) वाशिमचे डॉ. भरत गीते, जिल्हा समन्वयक (आत्मा) जयप्रकाश लव्हाळे, मंडळ कृषी अधिकारी (वाशिम) इंगोले, जिल्हा व्यवस्थापक (महाबिज वाशिम) सागर सावरकर, वरिष्ठ केंद्र अभियंता (महाबिज वाशिम) सतीश सोनुले आदी अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाव्यवस्थापक विवेक ठाकरे यांनी महाबिजच्या सोयाबीनच्या नव्या वाणांबाबत व त्यांच्या बीजोत्पादन कार्यक्रमाबाबत तसेच सोयाबीनला पर्याय म्हणून मका पिकाची लागवड याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
विभागीय व्यवस्थापक गजानन देशमुख यांनी उत्पादन व विपणन अंतर्गत महाबिजकडे उपलब्ध असलेल्या सोयाबीन, तूर, मूग, उडीद इत्यादी वाणांची माहिती दिली.
जिल्हा व्यवस्थापक सागर सावरकर यांनी महाबिजच्या जैविक खतांबाबत, ऊती सवर्धित केळी वाण G-9, पपई रोपे, ‘महाबिज YouTube चॅनेल’, ‘महाबिज वार्ता’ यांची माहिती दिली.
मंडळ कृषी अधिकारी इंगोले यांनी पोखरा टप्प्यातील विविध योजनांची माहिती दिली.कृषी संशोधन केंद्राचे डॉ. भरत गीते यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञानावर सखोल मार्गदर्शन केले.जिल्हा समन्वयक जयप्रकाश लव्हाळे यांनी माती परीक्षणाचे फायदे शेतकऱ्यांना पटवून दिले.सदर कार्यक्रमाला सुमारे १७५ पेक्षा अधिक शेतकरी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कृषी क्षेत्र अधिकारी नितेश पुसाम, क्षेत्र सहायक मुनीर शेख व गावातील बीजोत्पादक/शेतकरी यांनी मोलाचे सहकार्य केले.