
नागपूर, दि. 29 मे 2025: – ग्राहकांना गुणवत्तापूर्ण आणि अखंडित सेवा देण्यासाठी उपकेंद्राचे अत्यंत उत्कृष्टरित्या सक्षमीकरण आणि नूतनीकरण करण्यात आल्यामुळे महावितरणच्या नागपूर परिमंडल अंतर्गत असलेल्या कळमेशवर उपविभागातील धापेवाडा येथील 33/11 केव्ही विद्युत उपकेंद्राला आयएसओ 9001:2015 चे मानांकन मिळाले आहे. विशेष म्हणजे आयएसओ.मानांकन मिळणारे धापेवाडा हे नागपूर जिल्ह्यातील पहिले उपकेंद्र ठरले आहे.
जिल्ह्यातील काटोल विभागा अंतर्गत धापेवाडा उपकेंद्रातूवरील सर्व वीज ग्राहकांना सर्व ग्राहकांना 24 X 7 वीज वितरण, 33/11 केव्ही उपकेंद्र, उच्चदाव व लघुदाब वाहिन्या, आणि वितरण रोहीत्रांच्या ग्राहक सेवांचे संचालन आणि देखभाल यासाठी आयएसओ 9001:2015 मानांकन देण्यात आले आहे.
महावितरणच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’ अर्थात ग्राहकांचे जीवनमान उंचावण्यासाठी वीज हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठा करणे ही महावितरणची जबाबदारी आहे. आय.एस.ओ. मानकानुसार उपकेंद्रात झालेल्या उत्कृष्ट कामाचा फायदा ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याकरीता होणार आहे. या उपकेंद्रासाठी कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने केलेल्या उत्कृष्ट कामातून प्रेरणा घेत इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी आपआपल्या क्षेत्रात पूर्ण क्षमतेने उत्कृष्ट काम केल्यानेच हे मानांकन मिळालेल्ले आहे.
उपकेंद्राला सर्वोत्कृष्ट मानांकन मिळवायचेच या ध्येयाने नागपूर परिमंडलचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, नागपूर ग्रामिण मंडलचे अधीक्षक अभियंता संजय वाकडे, काटोल विभागाचे कार्यकारी अभियंता दिपक आगाव यांचेसोबत विभागातील अतिरीक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता आणि उपकेंद्रातील सर्व कर्मचारी, सुरक्षा रक्षक, बाह्यस्रोत कर्मचारी यांनी एकसंघपणे अथक परिश्रम घेतल्यानेच हे मानांकन मिळाले आहे.