मॉ शितला प्राणप्रतिष्ठा समारोह ३ जूनपासून तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन

0
19

गोंदिया : स्थानिक बाजपेयी वॉर्ड गौतमनगर येथील शितला माता मंदिरात मॉ शितला सेवा समितीच्या वतीने तीन दिवसीय मॉ शितला प्राणप्रतिष्ठा समारोहाचे आयोजन ३ ते ५ जून या कालावधीत करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरूवात ३ जून रोजी सकाळी ८:०० वाजता कलश यात्रा काढून करण्यात येणार आहे. यानंतर मॉ शितला पुजन, मंडल पुजन, आवाहन स्थापना, दसविधी स्थापना, पंचगव्य, पंचामृत, औषधी, दुपारी १२:३० वाजता जलाधिवास पाठ, जाप प्रारंभ, सायंकाळी ४:०० वाजता अन्नाधिवास व संध्या आरती होणार आहे. बुधवार, ४ जून रोजी सकाळी ८:०० वाजता मुर्ति जागरण, पुजन व अभिषेक, फलाधिवास, पुष्पाधिवास, सायंकाळी ४:०० वाजता यज्ञ, संध्या आरती, रात्री शयनाधिवास व गुरूवार, ५ जून रोजी सकाळी ८:०० वाजता मुर्ति जागरण, प्राणप्रतिष्इा व शृंगार, नैत्रोमीलन, सकाळी ११:०० वाजता पूर्णाहुती, आरती, दुपारी १२:०० वाजता अतिथी सन्मान समारोह व सायंकाळी ५:०० वाजता संध्या आरतीनंतर महाप्रसाद आयोजित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून तिरखेडी आश्रमचे संत ज्ञानीदास महाराज, गिधाडी आश्रमचे यशश्वरानंद महाराज, अखंड आश्रमचे कृष्णकांत दिक्षीत महाराज, शैलेश शास्त्री महाराज, प्रजापिता ब्रम्हकुमारी संचालिका राजयोगिनी रत्नमाला दीदी, गोपालनाथ महाराज, गुरूव्दारा सभाचे ज्ञानी भसरसिंग सैनी, दिगंबर जैन मंदिराचे धरमचंद जैन, गायत्री शक्तीपीठचे डॉ.विपीनचंद्र बैस, मुख्य अतिथी म्हणून आ.विनोद अग्रवाल, आ. डॉ.परिणय फुके, आ.विजय रहांगडाले, माजी खासदार सुनिल मेंढे, माजी आमदार राजेंद्र जैन, अदानी प्रकल्पाचे प्रबंधक मयंक दोषी आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे, असे आवाहन मॉ शितला सेवा समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मंडळातर्फे करण्यात आले आहे.