टाकाऊ कचऱ्यापासून सुद्धा नगर परिषदेला मिळते उत्पन्न

0
109

तिरोडा नगर परिषद क्षेत्रात सुमधुर संगिताच्या ध्वनित होते कचरा संकलन

गाडीवाला आया घरसे कचरा निकाल

चित्रा कापसे/तिरोडा- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नगर परिषद तिरोडा येथील ओझोन घंटागाडी सुमधुर संगिताच्या ध्वनित सकाळ सकाळी नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या वार्डावार्डात फिरत असते व घरोघरी दारासमोर थांबवून सुका कचरा व ओला कचरा संकलन करीत असते.

ओझोन घंटागाडी च्या निळ्या रंगाच्या डब्यात सुका कचरा तर हिरव्या रंगाच्या डब्यात ओला कचरा जमा केला जातो, त्यानंतर हा संपूर्ण कचरा डंपिंग यार्ड भिवापूर येथे एकत्र केला जातो,ओला कचरा जमा करण्यासाठी सहा टाक्या तयार करण्यात आलेल्या असून त्या कचर्यापासून गांडूळ खताची निर्मिती केली जाते,तो गांडूळ खत नगर परिषद हद्दीतील शहरातील विविध भागात वृक्षारोपण केलेल्या झाडांना व गार्डन मधील झाडांच्या उपयोगात ऊत्तम खत झाडाच्या संवर्धनासाठी व वृक्ष वाढीसाठी केला जातो,या वापरातून शिल्लक राहीलेल्या गांडूळ खत २ रुपये किलो प्रमाणे विक्रीसुद्धा केली जाते,वाळलेला कचरा सात बॅरीगेट मध्ये गोळा केला जातो त्यामध्ये प्लास्टिक,काच,चमडा,कागदं अशा विविध टाकाऊ पदार्थांना वेगवेगळे करून बाहेरच्या कंपनीत पाठविले जाते,त्यापासून सुद्धा दरमहा सरासरी ५ हजार रुपये च्या आसपास नगर परिषदेला भांडवल मिळत असते.
नगर परिषद तिरोडा येथे आरोग्य विभागाकडे ५ रिक्षा घंटागाडी,४ कायजन (ओझोन घंटागाडी),२ ट्रॅक्टर स्वच्छतेसाठी उपलब्ध असून याद्वारे शहरातील सर्व वार्डातील घराघरातील कचरा जमा करणे,नाली साफसफाई,रोड साफसफाई या सर्व कचर्याची नियमितपणे विल्हेवाट लावली जाते, अशाप्रकारे नगर परिषद तिरोडा येथील आरोग्य विभाग अत्यंत गंभीरतेने आपले कार्य करीत असते, या कामगीरीवर शहरवासीयांना समाधान असल्याचे बोलले जाते. स्वच्छतेसाठी नियमितपणे ब्लिचींग पावडर, नाली साफसफाई झाल्यावर मलेरीया आईल, पावसाळा लागण्यापूर्वी फाॅगींग मशिन द्वारे मच्छर मारण्यासाठी फवारणी सकाळ संध्याकाळ दोन दोन तास तिरोडा नगर परिषद क्षेत्रात होते ,सुमधुर संगिताच्या ध्वनित कचरा संकलनासाठी येणाऱ्या घंटागाडीची वाट नागरिक मोठ्या उत्सुकतेने बघत असतात हे विशेष.

नगर परिषद तिरोडा अंतर्गत शहरातील संपूर्ण वार्डातील घरातील ओला व सुका कचरा घंटागाडी च्या माध्यमातून नियमितपणे संकलीत करून नपच्या भिवापूर येथील डंपिंग यार्ड मध्ये विल्हेवाट लावली जाते,नाली साफसफाई व रोड साफसफाई कडे आरोग्य विभाग लक्ष देत असतो, कोणत्याही वार्डातून स्वच्छतेसाठी भ्रमणध्वनी वरुन सुचना मिळाल्यास तात्काळ कारवाई केली जाते, यामध्ये मला व माझ्या विभागातील कर्मचार्यांना देशसेवा करीत असल्याचा आनंद होतो. मनोज लारोकर,मुकादम आरोग्य विभाग नगर परिषद तिरोडा

आम्ही शहरातील कचरा आपल्या गाडीतून सुमधुर संगीताच्या स्वरात डंपिंग यार्ड मध्ये घेऊन जातो याचा आम्हाला खुपच आनंद होतो. प्रशांत गुणेरीया कायजन घंटा गाडी चालक