सरांडी येथे अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त दोन महिलांचा सत्कार

0
20

तिरोडा-तालुक्यातील ग्रामपंचायत सरांडी येथे आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्ताने गावातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दोन महिलांचा सत्कार ग्राम पंचायत सरांडी कार्यालयातर्फे सरपंच मिताताई दमाहे यांच्या हस्ते तसेच ग्रा.पं.सदस्य, गावातील पदाधिकारी गण इतर मान्यवर मंडळी,शाळेतील शिक्षक,अंगणवाडी ताई गावातील प्रतिष्ठित महिला वर्ग यांच्या उपस्थितीत सत्कार कार्यक्रम घेण्यात आला.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंती निमित्ताने राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार सरांडी गावातील
श्रीमती शालू शिवराम पराते,श्रीमती सुधा यशवंत दमाहे या दोन्ही महिलांना त्यांच्या सामाजिक कार्याकरिता शाल, श्रीफळ आणि प्रोत्साहनपर बक्षीस देऊन जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या माध्यमातून गावातील इतर महिलांना प्रोत्साहन मिळेल व महिलांचा सामाजिक कार्यात सहभाग मोठ्या प्रमाणात वाढेल असे मत माजी सरपंच किशोर दमाहे यांनी यावेळी व्यक्त केले.