पवार प्रगतिशील मंचची कार्यकारिणी गठीत,अध्यक्षपदी उकराम बिसेन

0
486

गोंदिया,दि.३१ : स्थानिक पवार प्रगतिशील मंचची निवडणूक १८ मे रोजी पार पडली. १५ संचालकांसाठी झालेल्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे १२ तर प्रगती विकास पॅनलचे ३ संचालक निवडणूक आले होते. आज ३१ मे रोजी स्थानिक पोवार बोर्डिंग येथे समाजाचे वरिष्ठ झामसिंग बघेले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेत कार्यकारिणी गठीत करण्यात आली. कार्यकारणीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते उकराम बिसेन यांची निवड करण्यात आली.
आज पार पडलेल्या सभेच्या नवनियुक्ती कार्यकारिणीचे गठण करण्यात आले. अध्यक्षपदी उकराम बिसेन, उपाध्यक्ष लिलाधर पटले, सचिव हुपेंद्र बोपचे, कोषाध्यक्ष योगेश ठाकरे, सहसचिव सौ.उर्मिला रहांगडाले, संघटन सचिव दिपक देशमुख तर प्रचार सचिवपदी अ‍ॅड. रजत ठाकुर यांची नियुक्ती करण्यात आली. तर नवनियुक्ती संचालकांमध्ये अ‍ॅड. पृथ्वीराज चव्हाण, अ‍ॅड. टी. बी. कटरे, अ‍ॅड. योगेश रहांगडाले, विश्वनाथ पटले, अजय रहांगडाले, सौ. उपमा गौतम, सौ. धनीषा कटरे, छनेश चव्हाण यांचा समावेश आहे. आयोजित सभेचे अध्यक्ष यांनी समाज हितासाठी कार्य करण्याचे आवाहन नियुक्ती कार्यकारिणीला केले. यावेळी पुर्व अध्यक्ष संजय रहांगडाले, राजेश चव्हाण, राजु बोपचे, सुरेश पटले, प्रवीण बिसेन, राजेश बिसेन, बाबा बिसेन आदी मान्यवर उपस्थित होते. आयोजित सभेचे संचालन पोवार स्वर्गरथ सेवा समितीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद ठाकरे यांनी केले तर सभेचे आभार नवनियुक्ती अध्यक्ष उकराम बिसेन यांनी मानले.