तिरोड्यातील आयटीआयमध्ये राज्यभिषेक सोहळा उत्साहात

0
6

तिरोडा,दि.०८ः येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात आणि राष्ट्रीय अभिमानाने साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी संस्थेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, तिरोडा येथील शाहिद मिश्रा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री. कोलते यांनी आपल्या प्रभावी आणि प्रवाही भाषणाने श्रोत्यांची मने जिंकली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय नेतृत्वगुणांबद्दल, जनकल्याणाचे महत्त्व आणि मानवी संसाधनांचे महत्त्व याबद्दल सांगितले.

त्यांनी त्यांच्या कल्याणकारी धोरणांवर आणि आधुनिक भारताच्या उभारणीतील त्यांच्या प्रेरणादायी कार्यावर प्रकाश टाकला. त्यांच्या भाषणाने संपूर्ण सभागृह भारावून गेले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, तिरोडा येथील अदानी पॉवर प्लांटचे महाव्यवस्थापक डॉ. विजय गंडेवार यांनी ‘नागरी कर्तव्ये आणि शिष्टाचार’ या विषयावर आपले विचार व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना जबाबदार, सुसंस्कृत आणि जागरूक नागरिक बनण्याचे आवाहन केले. कर्तव्ये आणि शिष्टाचार या विषयावर त्यांनी आपले विचार प्रभावीपणे मांडले. उपस्थित मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम खूप यशस्वी आणि प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात संस्थेचे योगदान सर्व कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे योगदान अमूल्य होते. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली.