राज्यस्तरीय ‘एकात्म मानव दर्शन’हीरक महोत्सव समितीची आढावा बैठक

0
11

गोंदिया,दि.9: पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानव दर्शन या लोककल्याणकारी विचारसरणीचा प्रभाव राज्यातील युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी “एकात्म मानव दर्शन हीरक महोत्सव समिती” स्थापन करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन गोंदिया, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी उमेश काशिद, सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय विभाग, सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन केंद्र गोंदिया रा. ना. माटे, कानतोडे व उमेश आगासे आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर बैठकीत  एकात्म मानव दर्शन प्रसार युवकांपर्यंत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे नियोजन, विद्यार्थ्यांसाठी निबंध, वकृत्व, चित्रकला व वादविवाद स्पर्धांचे आयोजन करून गुणवंत स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्याचे नियोजन. एकपात्री प्रयोग व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे दीनदयाळ उपाध्याय यांचा विचार सादर करण्यात येणार आहे‌, तसेच प्रचार आणि प्रसिद्धीसाठी विविध माध्यमांतून व्यापक जनजागृती एकात्म मानव दर्शन या विचारसरणीवर आधारित पुस्तके प्रकाशित करून ती शालेय विद्यार्थी, शिक्षक, महिला, शेतकरी, कामगार व इतर घटकांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्टे ठेवण्यात आले आहे.