क्रांतीसुर्य वीर बिरसा मुंडा बलिदान दिनानिमित्त गोठणगाव येथे आरोग्य शिबिर

0
33

गोंदिया -पोलीस दादालोरा एक खिडकी योजनेअंतर्गत पोलीस विभाग व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने उद्या दि. 9 जुन रोजी क्रांतीसुर्य वीर बिरसा मुंडा बलिदान दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगाव येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरा दरम्यान 106 गरजु लोकांनी आरोग्य शिबीराचा लाभ घेवुन मोफत तपासणी,औषधोपचार व मार्गदर्शनाचा लाभ घेतल्याची माहीती गोठणगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.स्नेहल  गायकवाड यांनी दिली आहे.
मोरगाव अर्जुनी तालुक्यातील घनदाट जंगलव्याप्त गोठणगावी तेथील नागरिकांना आरोग्याच्या मुलभुत सुविधा मिळ्ण्याच्या दृष्टीकोनातुन दि. 9 जुन रोजी क्रांतीसुर्य वीर बिरसा मुंडा बलिदान दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.देवेंद्र घरतकर व डॉ.स्नेहल गायकवाड तसेच सशस्त्र दूरक्षेत्र पोलीस ठाणे गोठणगावच्या वतीने पोलीस उपनिरिक्षक शुभम नवले व गिते यांच्या सामुहिक प्रयत्नाने गोठणगाव येथे आरोग्य शिबीर संपन्न झाले. शिबीरादरम्यान 107 लोकांची तपासणी निदान व औषधोपचार करण्यात आले त्यासोबत आवश्यक रुग्णांची ईसीजी,अंसासर्गिक कार्यक्रम अंतर्गत रक्तदाब व मधुमेह तपासणी. सिकलसेल तसेच मोफत प्रयोगशाळा रक्त तपासणी करण्यात आल्याची माहीती वैद्यकीय अधिकारी डॉ.स्नेहल  गायकवाड यांनी दिली आहे.
आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र गोठ्णगावचे आरोग्य सहाय्यक संतोष पारधी व किशोर कुर्वे, आरोग्य सहायिका लक्ष्मी मुनेश्वर,फार्मासिस्ट मुकुल बडवाईक, आरोग्य सेवक अमोल मालेकर,आरोग्य सेविका प्रमिला रॉय,स्टाफ ब्रदर चिरायु वावरे यांचे सोबत फुलचंद चौधरी, आशा सेविका सविता टेंभुर्णे,भाग्यश्री राणे,परिचर कुमुद शहारे व बागडे यांनी आरोग्य सेवा दिली तर शिबीरा दरम्यान एच.एल.एल.महालँबचे नेहा कापगते यांनी सिकलसेल व सि.बी.सी,कोलेस्ट्रॉंल, एच.डी.एल, एल.डी.एल.,लिपिड प्रोफाइल महालॅब च्या वतीने विविध प्रयोगशाळा तपासणी रक्त तपासणी व समुपदेशन करण्यात आले.अरविंद उके यांनी नोंदणी व वैद्यकिय अधिकारी डॉ.स्नेहल  गायकवाड यांनी असंसर्गजन्य आजाराविषयी मार्गदर्शन व समुपदेशन केले.
सशस्त्र दूरक्षेत्र पोलीस ठाणे गोठणगावच्या वतीने पोलीस उपनिरिक्षक शुभम नवले,गिते व यादव,पोलीस हवालदार सतीश भोवते,पोलीस नाईक कमलेश अलविंद वालदे,पोलिस हवालदार थेर,पोलिस शिपाई मेश्राम यांनी आरोग्य तपासणी शिबीर यशस्वीसाठी सहकार्य केले.