माजी आमदार राजेंद्र जैन व प्रफुल अग्रवाल जिल्हा बँक निवडणूकीत निर्विरोध विजयी
गोंदिया,दि.18- गोंदिया जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेची निवडणूक येत्या २९ जून २०२५ रोजी होणार आहे.त्याकरीता उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी १७ जागेकरीता होत असलेल्या निवडणुकीकरीता ३७ उमेदवार रिंगणात आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बँकेचे विद्ममान अध्यक्ष माजी आमदार राजेंद्र जैन हे पगारदार व इतर नागरी संस्था गटातून निर्विरोध निवडून आले.या गटातून काँग्रेसचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांचे पुत्र प्रफुल गोपालदास अग्रवाल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
त्याचप्रमाणे वैयक्तिक गटातून काँग्रेस गटाचे जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक प्रफुल गोपालदास अग्रवाल हे निर्विरोध निवडून आले असून या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे निखिल राजेंद्र जैन यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.यापुर्वी अर्ज पडताळणीमध्ये देवरी तालुका सेवा सहकारी गटातून भाजपचे प्रमोद संगीडवार हे निर्विरोध निवडून आले होते.या निवडणूकीत काँग्रेस राकाँ व भाजपचा प्रत्येकी एक संचालक निर्विरोध निवडून आला आहे.
या निव़डणूकीत २ विद्यमान आमदार व १ माजी आमदार रिंगणात असून बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष व सचिव हे एकमेकाविरोधात रिंगणात आहेत.३ उमेदवार निर्विरोध निवडून आल्याने उर्वरित १७ जागांकरीता मात्र निवडणूक होणार आहे. सेवा सहकारी संघटना व काँग्रेस यांच्यात या निवडणुकीकरीता युती झाली आहे.त्यामुळे भाजप राष्ट्रवादीच्या महायुतीला फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सेवा सहकारी गट गोंदिया तालुका– सहकार पॅनलच्यावतीने केतन शिवशंकर तुरकर तर परिवर्तन पॅनलच्यावतीने संजय चौधरी,सेवा सहकारी गट आमगाव तालुका-सहकार पॅनलच्यावतीने भैरसिंह नागपुरे तर परिवर्तन पॅनल समर्थित सुभाष आकरे,सालेकसा तालुका सहकार पॅनलचे प्रभाकर दोनोडे व परिवर्तन पॅनलचे येजेंद्रकुमार कटरे,देवरी तालुका– प्रमोद संगिडवार,सडक अर्जुनी तालुका सहकार पॅनलचे गजानन परशुरामकर तर परिवर्तन पॅनलचे गंगाधर परशुरामकर,गोरेगाव तालुका- परिवर्तन पॅनल समर्थित दुर्गाप्रसाद ठाकरे तर सहकार पॅनलचे योगराज पारधी,तिरोडा तालुका परिवर्तन पॅनलकडून श्रीमती वंदना अंबुले तर सहकार पॅनलकडून विजय भरतलाल रहागंडाले व अर्जुनी मोरगाव तालुका गटातून सहकार पॅनलकडून केवलराम पुस्तोडे,मोरेश्वर कोरे व विजयाबाई दयाराम कापगते रिंगणात आहेत.
औद्योगिक गटातून सहकार पॅनलकडून रेखलाल टेंभरे तर परिवर्तन पॅनलकडून अरुणकुमार दुबे,जंगलकामगार सहकारी संस्था गटातून परिवर्तन पॅनलकडून अशोक गुप्ता,सहकार पॅनलकडून अजयसिंह गौर व मृत्युंजय सिंह रिंंगणात आहेत.डेअरी गटातून सहकार पॅनलकडून राजकुमार कुथे तर परिवर्तन पॅनलकडून पंकज यादव रिंगणात आहेत.मत्स्यव्यवसाय गटातून सहकार पॅनलकडून सावलराम मारबते तर परिवर्तन पॅनलकडून अजय हलमारे,मजुर सहकारी संस्था गटातून सहकार पॅनलकडून राजू नेमिचंद जैन तर परिवर्तन पॅनलकडून विजयकुमार राठोड,पगारदार गटातून राजेंद्र हिरालाल जैन,वैयक्तीक गटातून प्रफुल गोपालदास अग्रवाल,
अनु.जाती जमाती गटातून सहकार पॅनलकडून राजकुमार बडोले तर परिवर्तन पॅनलकडून दिलीप बनसोड,महिला राखीव गटातून सहकार पॅनलकडून रचना गहाणे,प्रिया हरिणखेडे तर परिवर्तन पॅनलकडून ज्योती पटले व उषा मेंढे रिंगणात आहेत.व्हीजेएनटी गटातून सहकार गटातून विनोद कन्नमवार,परिवर्तन पॅनलकडून दामोदर नेवारे,अपक्ष रघुनाथ मेश्राम रिंगणात आहेत.तर ओबीसी गटातून परिवर्तन पॅनलकडून राधेलाल पटले तर सहकार पॅनलकडून डाॅ.अविनाश जायस्वाल रिंगणात आहेत.
तीन तालुक्यात बंडखोरीः भाजपपुढे आव्हान
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वच मतदार संघात चुरसीची निवडणूक होणार असे दिसून येत आहे. त्यातच तालुका सहकारी मतदार संघात बंडखोरी झाल्याने भाजपच्या पुढाऱ्यांमुळे आव्हान उभे झाले आहे. गोरेगाव तालुका सेवासहकारी मतदार संघातून भाजपचे दुर्गाप्रसाद ठाकरे व आमगाव तालुका सेवा सहकारी मतदार संघातून भाजपचे वरिष्ठ सहकार नेते सुभाष आकरे हेकाँग्रेसप्रणित परिवर्तन पॅनलकडून रिंगणात आहेत. तर भाजपचे माजी आमदार स्व.दयाराम कापगते यांच्या पत्नी विजयाताई कापगते यांनी सेवा सहकारी गटातून उमेदवारी कायम ठेवल्याने भाजपच्या उमेदरावारासमोर आवाहन उभे झाले आहे.