41.3 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home विदर्भ बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय परिसरात हिमालया बेबी केयर स्थापित

बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय परिसरात हिमालया बेबी केयर स्थापित

0
97

blank

गोंदिया, दि.20 : आयुक्त, वैद्यकीय संशोधन व आयुष यांचे आदेशान्वये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया यांचे अधिनस्त परिसरातील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय व केटीएस रुग्णालय गोंदिया येथे हिमालया बेबी केयर स्थापित करण्यात आले आहे.कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिगंबर मरसकोल्हे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.निलीमा पोयाम, बालरोगशास्त्र विभाग प्रमुख डॉ.धांदे, स्त्री रुग्ण विभागाच्या समाजसेवा अधीक्षक गोपाली खोटे व पुजा डांगोरे, अधिपरिचारिका निलम शुक्ला, समाजसेवा अधीक्षक मारोती कुचनकर, रोशन मस्के, योगेश सोनवणे, निलेश डांगोरे, हरिश्चंद्र कटरे, अजय सोळंकी तसेच संस्थेतील सर्व अधिकारी व कर्मचारी आणि कंपनीचे प्रतिनिधी श्री राकेश उपस्थित होते.

          अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे यांच्या हस्ते हिमालया बेबी केयरचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी डॉ.घोरपडे यांनी औषधी द्रव्य विभाग, मंत्रालय मुंबई आणि BULLS EYE MEDIA PVT. LTD कंपनी यांच्या सहकार्याने हिमालया बेबी फीडींग पॉड मार्फत रुग्णालयात दाखल होणाऱ्या नवजात बालकांच्या मातांना व नवजात शिशुंना लाभ मिळावा या उद्देशाने उपयुक्त आणि लाभदायक सुविधा उपलब्ध झाल्याचे नमुद केले. या सेवेमुळे रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांमध्ये मोठी भर पडणार असल्याचे सांगितले.