
चित्रा कापसे
तिरोडा-स्थानिक सी. जे. पटेल महाविद्यालयामध्ये आज दिनांक २१ जून २०२५ रोजी जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजयभरत सी. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ.शर्मा यांनी दैनंदिन जीवनामध्ये योगासनाचे महत्व आणि बौद्धिक व मानसिक संतुलनामध्ये योगासनाची आवश्यकता या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये योगाची सुरुवात झाली असून आज पूर्ण विश्वामध्ये योग दिवस हा जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो यावर सुद्धा प्रकाश टाकत मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी व एन. एस. एन.सी. सी. च्या विद्यार्थ्यांना प्रा. मूलचंद बघेले यांनी योगासन, प्राणायाम याचे प्रात्यक्षिक दिले. व या कार्यक्रमाचे संचालन शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. भूषण फुंडे यांनी केले.