41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ मोहाडी येथे आरोग्य उपकेंद्राच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन

मोहाडी येथे आरोग्य उपकेंद्राच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन

0
110

blank

गोरेगाव -२१/६ मोहाडी परिसरातील नागरिकांना एक अत्यंत आनंदाची बातमी मोहाडी येथे आरोग्य विभाग जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान पायाभूत सुविधा जिल्हा वार्षिक योजनेतून एक करोड दहा लक्ष रूपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या नवीन आरोग्य उपकेंद्र इमारतीचे भूमिपूजन गोंदिया जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती डॉ लक्ष्मणजी भगत यांच्या आज दिनांक २१ जुन ला मोठ्या उत्साहात पार पडले. नवीन आरोग्य उपकेंद्राच्या उभारणी मुळे मोहाडी व परिसरातील नागरिकांना उच्च व चांगल्या दर्जेदार आरोग्य उपचार मिळणार असून आरोग्य सुधारण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. आरोग्य उपकेंद्र च्या माध्यमातून मोहाडी परिसरातील नागरिकांना उत्तम दर्जाचे आरोग्य सुविधाचा लाभ मिळणार असून हे उपकेंद्र ग्रामीण आरोग्य व्यवस्थाच्या बळकटीसाठी एक महत्त्वाचा पाऊल ठरेल असा विश्वास सभापती डॉ लक्ष्मणजी भगत यांनी केले.
यावेळी गोरेगाव पंचायत समिती चे सभापती चित्रलेखा चौधरी, सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे, उपसरपंच मोहनलाल पटले, तंन्टामुक्त गांव समिती चे अध्यक्ष लिखीराम बघेले, सदस्य योगराज भोयर, भिवराज शेंन्डे,पुस्तकला पटले, चन्द्रकांता पटले,नेहा उके, पोलिस पाटील राजेश येळे, माजी उपसरपंच श्रीराम पारधी,रूपचंद पटले,चुळामण पटले,प्रमानंद तिरेले, कमलेश पारधी, हिरालाल महाजन,सुरजलाल येळे, विक्की धपाडे,माजी सैनिक कुवरलाल चौधरी डॉ यामेश भगत हिरामण पटले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

blank