भिवरामजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वडगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

0
8

चित्रा कापसे
तिरोडा –भिवरामजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव येथे प्राचार्य डी. आर. गिरीपुंजे यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ शिक्षक आर के किरसाण ,जी एन बिसेन, एस पी भगत, जे सी लांजेवार ,घनश्याम मेश्राम, अरविंद राठोड, राजकुमार मेश्राम ,शुभम टेंभरे, अरविंद टेंभेकर, संगीता वालदे, विनोद धावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले .
याप्रसंगी विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शालेय पटांगणावर योगासने केली .शारीरिक शिक्षणात पारंगत असलेले डी एस बोदेले सर यांनी विद्यार्थ्यांना योग दिनावर तसेच योगाचे शरीराला काय महत्त्व आहे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी व कर्मचारी वृंदांनी याचा लाभ घेतला.
यावेळी वर्ग दहावीची ऋतू रूपराज ठाकरे या विद्यार्थिनीने विविध आसने करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले .
कार्यक्रमाचे संचालन गोविंदप्रसाद बिसेन, प्रास्ताविक रविदास कीरसान, आभार प्रदर्शन एस पी भगत यांनी केले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.