33.7 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home विदर्भ मिसपिरी येथे आरोग्य तपासणी व जनजागृती शिबीर

मिसपिरी येथे आरोग्य तपासणी व जनजागृती शिबीर

0
37

blank

गोंदिया,दि.२६ः जिल्ह्यात धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान 49 गावात राबविण्यात येणार आहे.त्यातुन शासनाच्या विविध योजना व त्याचा लाभ गावपातळीवरील लोकांना पोहचविणे आहे.जिल्हाचे शेवटचे टोक असलेल्या मिसपिरी येथे दि. 25 जुन रोजी ग्रामपंचायत मिसपिरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र ककोडी यांचे मार्फत धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत आरोग्य मेळाव्यात आरोग्य तपासणी व जनजागृती शिबीर संपन्न झाल्याची माहीती वैद्यकीय अधिकारी डॉ.रामटेके यांनी दिली आहे.
दि. 25 जुन रोजी ग्रामपंचायत मिसपिरी येथे धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान आरोग्य मेळाव्याचे उदघाटन देवरी पंचायत समिती सदस्य अनुसयाताई सलामे, ग्राम मिसपिरीचे सरपंच रसवंती उसेंडी, उपसरपंच जीवनजी सलामे, ग्रामसेवक अंबादे, प्रा. आ. केंद्र ककोडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.रामटेके,भरारी पथकाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आनंद कुकडे,आरोग्य सेविका एस.एस.थोटे व एम.आर.लंजे,आरोग्य सेवक एस.एस.टेंभुर्णे, कार्यक्षेत्रातील आशा गटप्रवर्तक व आशा सेविका यांनी उपस्थिती राहुन आरोग्य सेवा दिली.
दि. 25 जुन रोजी ग्रामपंचायत मिसपिरी येथे धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान आरोग्य मेळावा घेण्यात आले.यामध्ये शासनाच्या सर्व विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते.प्राथमिक आरोग्य केंद्र ककोडीच्या वतीने आरोग्य विभागाचा स्टॉल लावण्यात आला.या ठिकाणी अंसासर्गिक कार्यक्रमाच्य अनुशंगाने रक्तदाब व मधुमेह तपासणी,सिकलसेल तपासणी, रक्तगट सोबतच गरजु लोकांची वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत आरोग्य तपासणी व समुपदेशन करुन औषधोपचार करण्यात आला.आरोग्य विभागाच्या जनजागृती स्टॉल मध्ये क्षयरोग,कुष्ठरोग,सिकलसेल,हिवताप,स्टॉप डायरीया, मलेरिया व इतर राष्ट्रीय कार्यक्रमाच्या बॅनर व पोष्टरच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आल्याची माहीती प्राथमिक आरोग्य केंद्र ककोडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.रामटेके यांनी याप्रसंगी दिली आहे.