
देवरी,दि.4 जुलै – तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय येथील सभागृहात विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा सभा संपन्न झाली.सदर आढावा सभेत जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण,देवरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ललित कुकडे उपस्थित होते.आढावा सभेत देवरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी,सामुदायिक आरोग्य अधिकारी,आरोग्य सहायक,आरोग्य सहयिका,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,आशा गट प्रवर्तक, तालुका स्तरीय कर्मचारी उपस्थित होते.
आढावा सभेत जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत यांनी माता व बाल मृत्यु टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे त्यात किशोरावस्थापासुनच त्यांच्या विविध तपासणी सोबत गरोदर मातेचे बारा आठवड्याच्या आत नोंदणी,लोह,रक्तक्षय व कँल्शियम यांची मात्रा लाभार्थ्यांना देणे,वेळेत लसीकरण व फॉलोअप ठेव्ण्याच्या सुचना दिल्या.आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली(एच.एम.आय.एस.) ,एकात्मि
एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम (IDSP) हे साथीचे रोग तसेच इतर आरोग्यविषयक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करण्यासाठी महत्वाचे पोर्टल असुन सर्व आरोग्य संस्थानी एस,पी व एल.फॉर्म दैंनदीन भरण्याच्या सुचना दिल्या.
जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी पावसाळ्यात जलजन्य व किटकजन्य आजार जसे हिवताप व डेंग्युची रुग्ण संख्या कमी करण्यासाठी आरोग्य कर्मचारी यांचे नियमित गृहभेटी सर्वेक्षण,डासांची पैदास रोखण्यासाठी गावपातळीवर ग्रामपंचायतीचे उपाययोजना, गावात आरोग्य कर्मचार्यामार्फत करण्यात येणारे प्रतिबंधात्मक उपाययोजना, जैविक बाबी,प्रौढ डास व अळी कमी करण्याचे विविध पद्धती,मलेरियाच्या डासांची उत्पत्ती थांबवण्यासाठी उपाययोजना,नवीन आणि उपचारांच्या पद्धती विषयी मार्गदर्शन करणे,डासअळी नाशक पद्धती अशा विविध बाबींचा आढावा याप्रसंगी घेवुन मार्गदर्शन केले.आढावा सभा यशस्वीतेसाठी देवरी तालुका आरोग्य सहाय्यक वरखेडे, संगणक परिचालक शहारे यांनी विशेष प्रयत्न केले.