26.3 C
Gondiā
Friday, August 28, 2026
Home विदर्भ गुप्तधनासाठी बाेदराईच्या जंगलात खोदकाम

गुप्तधनासाठी बाेदराईच्या जंगलात खोदकाम

0
13

सतिश कोसरकर

नवेगावबांध,दि.23: नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव जंगलात बोदराईनजीक  मंगळवारच्या १0 इसमांना नवेगावबांध वनविभागाच्या गस्ती पथकाने खोदकाम करतांना रंगेहाथ पकडले. या आरोपींनी अनधिकृत राखीव जंगलात प्रवेश करुन गुप्तधन शोधण्याच्या नावावर खोदकाम करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले असले तरी वन्य प्राण्यांची शिकार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, की गुप्तधनाचा शोध याचा तपास सुरू आहे.याप्रकरणी वनविभागाने त्या १0 आरोपींना अटक केली. गुरुवारी यापैकी ६ आरोपींची जमानतीवर सुटका झाली तर ४ आरोपींची भंडारा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
यामध्ये देवदास भिक्षू जनबंधू रा.रामपुरी, निकेश रामचंद्र गजबे रा.भुरसीटोला, करण शालीकराम गजबे रा.पिंडकेपार साकोली, विनोद मनोहर सावसाकडे रा.तर्िी (अड्याळ), किसनराव प्रभाकर टेंभरे रा.हौशंगाबाद (मध्यप्रदेश), मनोजकुमार भीमराव घोरमारे रा.मालेगाव भंडारा, कुंदन मेश्राम, शालीकराम गजबे, ज्ञानेश्‍वर विश्‍वनाथ वैद्य व उमेश गजबे सर्व रा.बिडटोला यांचा समावेश होता. गस्तीपथक तिथे जाऊन धडकले.घनदाट जंगलात हे लोक खड्डा खोदण्याचे काम करीत होते.वनकर्मचार्‍यांना बघून पाच आरोपी पळाले तर पाच आरोपी घटनास्थळावर सापडले. या पाच आरोपींना मंगळवारी अटक करुन बुधवारला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना दोन दिवसांची वनकोठडी मंजूर केली होती. बुधवारला पसार झालेल्या पाच आरोपींना अटक करुन गुरुवारला (दि.२२) पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. या सर्व आरोपींवर शस्त्रांसह वनकायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले. आरोपीतर्फे अँड.मोहन भाजीपाले तर वन विभागातर्फे अँड.राजेश पालीवाल यांनी युक्तीवाद केला.