40.6 C
Gondiā
Tuesday, June 16, 2026
Home विदर्भ माझे बाळ मला परत द्या; आईची आर्त हाक

माझे बाळ मला परत द्या; आईची आर्त हाक

0
72

blank

गोंदिया : खाजगी रुग्णालयात रुग्णांची आर्थिक पिळवणूक हा विषय कायम चर्चेत असतो. मात्र रुग्णालयात कार्यरत डॉक्टरचया प्रकाराला अधिक बळ देत आहेत. शिवाय याच विषयाला घेवून बाळ चोरीचे प्रकरणही समोर येत आहेत. मागील काही दिवसांपासून भंडारा येथील बाळ विक्रीचे प्रकरण चांगलेच गाजत असून रुग्णांच्या आर्थिक परिस्थितीचा लाभघेत हा बाळ विक्रीचा प्रकरण समोर आला आहे. विशेष म्हणजे विक्री झालेली ती चिमुकली तिरोडा तालुक्यातील सेजगाव (टोला) येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. परिणामी ते बाळ मला परत देण्यात यावे, अशी आर्त हाकही त्या चिमुकलीच्या आईने केली आहे.
सविस्तर असे की, तिरोडा तालुक्यातील सेजगाव (टोला) येथील एका महिलेने तिसऱ्यांदा मुलाली १६ ऑक्टोबर २०२५ रोजी रामनगर येथील न्यु बालाजी रुग्णालय येथे जन्म दिला. दरम्यान ते प्रिम्युचअर असल्याने तिला उपचारासाठी बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. या रुग्णालयात जवळपास १ महिना ५ दिवस तिच्या उपचार सुरू राहिले. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने पुन्हा २२ नोव्हेंबर २०२५ पासून तिच्यावर रामनगर येथील न्यु बालाजी रुग्णालय येथे डॉ. नितेश बाजपेयी यांच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. फिर्यादी महिला व तिच्या पतीच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेत डॉक्टरांनी तिच्या उपचारासाठी नागपूर येथे जाण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर सदर मुलीवर आम्हीच उपचार करून देवू, तुम्ही त्या मुलीला सोडून द्या, असाही आमिषपूर्ण सल्ला दिला. त्यामुळे सदर दाम्पत्याने डॉक्टराच्या विश्वासावर मुलीला उपचाराकरीता स्वाधीन केले. मात्र दुसरीकडे डॉक्टर व त्यांच्या टोळीने भंडारा जिल्ह्यातील वरठी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पांढराबोडी येथील एका महिलेला परस्पर विक्री केली. पांढराबोडी येथील नागरिकांना या प्रकरणाला घेवून संशय निर्माण झाला. त्यामुळे भंडारा येथील महिला व बालकल्याण विभागाच्या चाईल्ड हेल्प लाईनवर संपर्क करून तक्रार करण्यात आली.
पोलिसांनी तपासकार्य सुरू केले असता त्या महिलेने मुलीला टोळीच्या सदस्यांना परत घेवून जाण्यास सांगितले. त्यानुरूप गोंदिया येथील तस्कर टोळीतील एक महिला कारने परत घेवून जात असताना वरठी पोलिसांनी मोहाडी पोलिसांशी संपर्क करून कोशारी या गावात सदर वाहन थांबविले. वाहनात मुलीसोबत बसलेल्या महिलेशी विचारपूस केली असता सर्व बाब चव्हाट्यावर आली. विशेष म्हणजे संबंधित डॉ. नितेश बाजपेयी याने ३ फेब्रुवारी रोजी सेजगाव गाठून त्या मुलीच्या आई-वडिलांना भंडारा येथे नेले. दरम्यान त्यांनी त्यांच्या काही तरी लिहून घेतल्याची माहिती त्या बाळाच्या आई-वडिलांनी दिली. तर दुसरीकडे ६ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी त्यांना पाचारण केले तसेच संगणकावर तक्रार लिहून घेतल्याची माहिती दिली. अद्यापही बाळ मिळाले नसून ते बाळ देण्यात यावे, अशी आर्त हाक त्या चिमुकलीच्या आई-वडिलांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना व्यक्त केली.