गोंदिया: सुवर्णकार सोनार समाज जिल्हा गोंदियाच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम, समाजबंधू पोलिसांचा सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि वर-वधू परिचय मेळावा उत्साहात पार पडला. गोंदिया येथील रिंग रोडवरील सुवर्णकार समाज सांस्कृतिक भवनात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाची सुरुवात संत नरहरी सोनार महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. या प्रसंगी सत्कारमूर्ती व मुख्य मार्गदर्शक म्हणून खासदार राजेंद्र जैन उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात खासदार राजेंद्र जैन यांनी सुवर्णकार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विविध उपक्रमांसाठी वैयक्तिक व शासकीय पातळीवर आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
या सोहळ्याला जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे, नगराध्यक्ष सचिन शेंडे, गजूजी फुंडे, तुलसीराम बांगरे, केतन तुरकर, प्रदीप रोकडे, मनीषा येरपुडे, उषाताई हर्षे, राज शुक्ला, मैतुलाताई बिसेन, सुधाकर ढोमणे, मुक्तानंद ढोमणे, भजे साहेब, अमृतराव थानलकर, शैलेश वासनिक आणि सुनील पटले यांच्यासह समाजातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





