चित्रा कापसे/तिरोडा-श्रावण मासातील पौर्णिमेच्या शुभ पर्वानिमित्त लायन्स क्लब तिरोडा पॉवरसिटीच्या वतीने आज, शुक्रवार दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजता भव्य रक्षासूत्र समारोह (रक्षाबंधन) आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम पोलिस स्टेशन, तिरोडा येथे आयोजित करण्यात आला असून, भाऊ-बहीण यांच्यातील प्रेम, स्नेह, विश्वास, संरक्षण आणि समर्पणाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाचा हा पवित्र उत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
या निमित्ताने लायन्स क्लबच्या वतीने उपस्थितांना रक्षासूत्र बांधून बंधुभाव, सामाजिक ऐक्य आणि परस्पर स्नेहाचा संदेश दिला जाणार आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून समारोहाची शोभा वाढवावी, असे आवाहन लायन्स क्लब तिरोडा पॉवरसिटीचे अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अध्यक्ष लायन ॲड. माधुरी आर. रहांगडाले, सचिव लायन दीपक शेळोकर आणि कोषाध्यक्ष लायन उमाशंकर पारधी यांच्यासह क्लबचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.





