
रामटेक,दि.६-येथील पवार य पोवार समाज बहुउद्देशीय संस्था रामटेकच्यावतीने येत्या रविवार १२ फेबुवारी रोजी रामाळेश्वर देवस्थान,मेन रोड रामटेक येथे राजाभोज जयंती महोत्सव व वार्षिक स्नेहसमेंलनाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे उदघाटन सकाळी १० वाजता राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय पक्ष समन्वयक व माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे यांच्या हस्ते बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून भंडारा पोवार समाज अध्यक्ष ेचेतन भैरम,बालाघाट येथील मोसमताई बिसेन,रामटेकचे नगराध्यक्ष दिलीप देशमुख,ओबीसी संघर्ष कृती समिती गोंदिया जिल्हा अध्यक्ष बबलू कटरे,बेरार टाईम्सचे संपादक व गोंदिया भंडारा जिल्हा ओबीसी संघर्ष कृती सयोंजक खेमेंद्र कटरे,सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण गौतम,शिवसेना जिल्हाध्यक्ष व किसान गर्जेना अध्यक्ष इंजि.राजेंद्र पटले,राजयोगीनी ब्रम्हकुमारी ललीतादीदी,पोलीस पाटील खुशाल ठाकरे व डॉ.पटले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमात समाजातील इयत्ता १० व १२ च्या गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात येणार असून कार्यक्रमाचे हे पहिलेच वर्ष असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष भगवानदास बिसने,उपाध्यक्ष छमेशकुमार पटले,सचिव संजय बिसेन,आशिष शरणागत,आशिष भगत,खरकqसग बिसेन,रमेश पटले,जयqसग बिसेन,उमेश पटले,भोजराज कटरे,राहुल जैतवार,सचिन भोयर आदीनी दिली.