विदर्भ एक्सप्रेसमध्ये चालतोय टीटी व पोलिसांसमक्ष खूला जुगार

0
9

गोंदिया,दि.06- नागपूरवरुन सकाळी ९ वाजता सुटणार्या विदर्भ एक्सप्रेसमध्ये गोंदिया-भंडारा येथे नोकरीसाठी अपडाऊन करणारे अधिकारी-कर्मचाèयांची संख्या खुप मोठी आहे. हे कर्मचारी कामठीनंतर बिंनधास्त टोळी-टोळीने बसून पत्ते खेळतात. साधे पत्ते खेळत नाही तर ते त्यावर पैशाची बोली लावून त्याची नोंद सुध्दा कागदावर ठेवतात.जे शासनाच्या विविध विभागात नोकरीला आहेत असे ज्यांच्याकडून समाजाने काही शिकावे असे नेहमी सांगितले जाते नव्हे तर कार्यालयात गेल्यावर ते तसा सल्ला  सुद्धा देतात. हा प्रकार रेल्वे डब्ब्यात टिकीट तपासणीसाठी येणाèया टीटी व त्यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकालाही उघड्या डोळ्यांनी दिसतो. परंतु टीटी व सुरक्षा रक्षक त्या कर्मचाèयांना हटकत नसल्याचे ही दिसून आले. या पत्ते खेळणाèयांमध्ये भंडारा जिल्हा परिषद, गोंदिया जिल्ह परिषद, केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय, कृषी विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग,जिल्हाधिकारी कार्यालयासह पाटबंधारे विभागासह बँक व इतर विभागातील कमर्गचार्यांची मोठी संख्या असते. शासकीय वेळ कार्यालयात येण्याची १० वाजताची असते. मात्र हे सटोळी कर्मचारी-अधिकारी कार्यालयात ११.३० नंतर पोहोचतात. तरी ही वरिष्ठ कारवाई करीत नाही. याचा अर्थ वरिष्ठ अधिकारी या अपडाऊन कर्मचाèयांना पाठिशी घालत असल्याचे चित्र दिसते.तिकडे गोंदियाच्या जिल्हाधिकायाला स्वतःटोपी घालून फोटोशेसन शिवाय वेळच नसल्याने व छपासची बिमारी असल्याने त्यांचे नियंत्रणच राहिलेले नाही.जिल्हा परिषदेला तर गेल्या अनेक वर्षापासून प्रमोटी अधिकारी देऊन जिल्हा परिषद यंत्रणेची वाताहत येथील नेत्यांनी सुरु केली आहे,त्यामुळे त्यांच्याकडून या अपडाऊन सटोळी कर्मचारीवर्गावर कारवाईची अपेक्षा करणे चुकीचे होईल पण रेल्वेने यांच्यावर दंडात्मक कारवाई केली तर काही तरी प्रमाणात सुधारणा मात्र नक्की होईल यात शंका नाही.