प्राचार्य नासरे यांचे निधन

0
14

गोंदिया,दि.26- गोंदिया शिक्षण संस्थेच्या नटवरलाल मानिकलाल दलाल महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश नासरे यांचे मंगळवारला सायंकाळी हृदयाघातामुळे निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा आज बुधवारला दुपारी १.३० वाजता त्यांचे राहते घर गणेशनगर, सहयोग कॉलोनी येथून निघणार आहे.ते महिला अर्बन बँकेच्या अध्यक्षा प्रा.डाॅ.माधुरी नासरे यांचे पती होते.येथील पार्वतीघाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.प्राचार्य नासरे यांच्या निधनाबद्दल गोंदिया शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार प्रफुल पटेल,मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल,माजी आमदार राजेंद्र जैन यांनी शोक व्यक्त केला आहे.