Home विदर्भ कल्लेड येथील नागरिकांनी भरमार शस्त्रे केली पोलिसांकडे जमा

कल्लेड येथील नागरिकांनी भरमार शस्त्रे केली पोलिसांकडे जमा

0

आलापल्ली(सुचित जम्बोजवार) दि. 29:: सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर हद्दीतील नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल कल्लेड येथे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांच्या उपस्थितीत काही नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने भरमार शस्त्रे पोलिसांकडे जमा करून नक्षलवाद्यांचा धिक्कार केला.
भेटीदरम्यान ग्रामस्थांनी नक्षल्यांपासून होणाऱ्या त्रासाला वाचा फोडली. नक्षल्यांनी आजपर्यंत दिलेल्या त्रासाला कंटाळून ग्रामस्थांनी एकमताने नक्षल गावबंदी योजना आपल्या गावात राबविण्याचा निर्धार केला. गावातील नागरिकांना पोलिसांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला नागरिकांनी उत्तर देत शस्त्र न उचलण्याचा निश्चय केला. गावातील नक्षलपिडीत अर्जुन मडावी यांच्या कुटुंबीयांची भेट घेवून आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी पोलिस उपनिरीक्षक मानसिंग पाटील, पोलिस उपनिरीक्षक निलेश चव्हाण, क्युआरटी सिरोंचा, श्रीकांत जाधव, उपपोलिस ठाणे झिंगानूर येथील कर्मचारी तसेच कल्लेड गावातील नागरिक उपस्थित होते.

Exit mobile version