वèहाड्यांएैवजी कार्यालयाच्या आत लावले विजेचे मेनस्विच

0
7

महिला बालकल्याण कार्यालय होऊ शकते आगीचे लक्ष्य
गोंदिया,दि.०५-गोंदिया जिल्हा परिषद ही आयएसओ जिल्हा परिषद.गेल्या अनेक वर्षापासून आयएसओचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी दरवर्षी लाखो रुपयाचा निधी अर्थसंकल्पात राखीव ठेवण्यात येतो.त्याच जिल्हा परिषदेचा पहिल्या माळ्यावरील महिला व बालकल्याण विभागाचे कार्यालय हे धोकादायक कार्यालय ठरले आहे.कारण या कार्यालयाच्या आतमध्ये पार्टेशन करुन पहिल्या माळ्यासह वरच्या माळ्यासांठी विजपुरवठा व्हावा म्हणून मेनस्विच बसवण्यात आले आहेत.या मेनस्विचमध्ये यापुर्वीही शार्टसर्किटच्या घटना घडल्या असून गेल्या महिन्यातच आगीचे गोळेही निघाले होते.वास्तविक कुठल्याही ठिकाणी विजेशी संबधीत मेनस्विच असो की कंट्रोल युनिट हे बाहेर वèहांड्यात qकवा मोकळ्या हवेशीर जागेच्या ठिकाणी बसविले जातात जेणेकरुन विजेच्या शार्टसर्किटने कुठलीही घटना घडली तर त्यावर लगेच नियंत्रण आणता येईल.परंतु आयएसओ जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाèयांना फक्त आपली चमकोगिरी करण्याशिवाय काहीच सुचत नसून महिला बालकल्याण विभागाच्या आत ठेवलेले मेनस्विच ज्यामूळे यापुर्वीही त्याठिकाणी शार्टसर्किटच्या घडल्या त्या बघून ते बाहेर कुठेतरी व्यवस्थित जागेवर बसविण्याचे नियोजन करु शकले नाही.वास्तविक या सर्व ईमारतीची देखभाल ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे.यासाठी मुख्यालयात उपअभियंता सुध्दा कार्यरत असतो.परंतु त्यांनी या गोष्टीकडे का दुर्लक्ष केले हे कळायला मार्ग नाही.आजही महिला बालकल्याण विभागातील कर्मचारी आपल्या कार्यालयात काम करीत असतांना भितीच्या वातावरणातच काम करतात.कधी आपल्या कार्यालयात विजेमुळे घटना होईल याची भिती त्यांची मनात घर करुन बसली आहे.विशेष म्हणजे या आयएसओ जिल्हा परिषदेला अभिषेक कृष्णानंतर सरळ आयएएस दर्जाच्या खमक्या अधिकारी न मिळाल्याने कुठलेही नियत्रंण त्यानंतर आलेल्या सीईओचे राहिलेले नाही.त्यानंतर आलेल्या प्रत्येक सीईओंने आपल्याला आपला कार्यकाळ पुर्ण करायचा आहे,त्या दरम्यान आपली एक छाप सोडण्यासाठी एकाच मुद्याला घेऊन ती री ओढायची बाकी सोडून द्यायचे या वृत्तीमूळेच विदर्भातील सर्वात मागास व कुठल्याही बाबतीत पारदर्शक प्रशासन नसलेली जिल्हा परिषद गोंदिया ठरली आहे,असे असले तरी आयएसओ नामाकंन टिकून आहे हेच या जिल्हा परिषदेच्या गौरवाची बाब ठरली आहे.