खेमेंद्र कटरे,गोंदिया,दि.२३: गोंदिया जिल्ह्यातील रेतीघाट खरेदीत शिरलेल्या मध्यप्रदेशातील शिवा गृपच्या व गोंदियातील काही सल़ग्न रेतीमाफियांची यथेच्छ धुलाई बनाथर येथील नागरिकांनी केल्यानंतर शिवागृपच्या कर्मचार्यांनी पळ काढला तर स्थानिक माफियांना ओळखीचा लाभ मिळाल्याने त्यांनीही नमते घेत जिव वाचविण्यातच भले मानले.मार खाणार्यामध्ये सत्ताधारी भाजपचे काही पदाधिकारी असल्याची चर्चा आहे.त्यातच या मारहाणीचा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोचला मात्र रेतीमाफियाविरुध्द पोलिसांनी कारवाई न करता गावकर्यारच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या मारहाणीत बनाथर येथील बहुजन समाजाचा कार्यकर्ता रवि दावने यास मारहाण केली असून गंभीर दुखापत झाली आहे.मारहाण करणारे वाहन क्रमाक एमपी ५४ सी५७५७ या वाहनाने दाखल झाले होते.तिकडे तिरोड्यातील मुंडीकोटा येथे रेतीघाटाला घेऊनच मारहाण झाली तर दुसरीकडे बनाथर येथील घाटावरून गावातील एका इसमाने एक ट्रक्टर रेती नेल्याने त्या इसमाला शिवा गृपच्या गुंडप्रवृत्तीच्या कर्मचार्यानी गावात येऊन मारहाण केली.त्याला मारहाण केल्याची माहिती गावात कळताच गावकरी सर्वांनी गावातील चौकातच नागरिकांनी एकत्र येत त्या ४ जणांची चांगलीच धुलाई केली.त्यात गोंदिया विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या एका नेत्याच्या खास कार्यकर्त्याची नागरीकांनी धुलाई केल्याने रेतीमाफियात चांगलीच धास्ती भरली आहे.